Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Indira Gandhi Junior College ; इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेजन चार खेळाडू विभागीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी रवाना – NNL

Indira Gandhi Junior College ; इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेजन चार खेळाडू विभागीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी रवाना – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नवीन नांदेड | महाराष्ट्र क्रीडा युवक सेवा संचनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड. यांच्या संयुक्त विद्यामानाने घेण्यात आलेल्या शालेय विभागीय स्तरावरील बॉक्सिंग क्रीडा स्पर्धे साठी इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेजच्या चार खेळाडू (19 वर्षाखालील)लातूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून यात नागेश बोंबले ,ओमकार मस्के, कु.सुप्रिया मोरे,कुं साक्षी हनुमंते इत्यादी खेळाडूचा आपापल्या गटामध्ये जिल्ह्यात प्रथम येऊन उद्या होणाऱ्या शालेय विभागीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी रवाना झाले. या यशाबद्दल सर्व खेळाडूचे शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष‌ खा. अशोकराव चव्हाण उपाध्यक्ष सौ.अमिताताई चव्हाण ,सचिव डी.पी.सावंत, सहसचिव शेंदारकर , कोषाध्यक्ष निंबाळकर, मुख्याध्यापक श्री जी.एम.शिंदे, प्राचार्य डॉ.बी.एल घायल,सुपरवायझर प्रा.चंदेल यु .सी,डॉ.संजय शिंदे ,प्रा. सातानुरे , सौ.फाजगे ,कोठुळे,डॉ.संजय...
Nanded district ; नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी विधानसभेसाठी 4 अर्ज दाखल – NNL

Nanded district ; नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी विधानसभेसाठी 4 अर्ज दाखल – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड | जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात बुधवारी दुसऱ्या दिवशी तीन उमेदवारांनी 4 अर्ज दाखल केले आहेत. भोकर येथे एकाच उमेदवाराने दोन अर्ज दाखल केले आहेत. नऊ मतदारसंघात 253 इच्छूक अर्जदारांनी 441 उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज दुसऱ्या दिवशी 17 इच्छुकांनी 28 अर्जाची उचल केली आहे. काल बुधवारी जिल्ह्यामध्ये 411 अर्जांची उचल करण्यात आली होती. तथापि काल विधानसभेसाठी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. आज मात्र 4 अर्ज दाखल झाले आहेत. विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे. नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, लोहा, किनवट, हदगाव, देगलूर, मुखेड आणि नायगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. नांदेड उत्तर मतदारसघात 41 उमेदवारांनी 67 अर्ज नेले आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघात 61 इच्छूकांनी 69 अर्जाची उचल...
Expenditure Inspectors Inspection ; खर्च निरीक्षकांकडून जिल्ह्यातील विभाग प्रमुखांचा आढावा एसएसटी, एफएसटी, सी-व्हिजील, एमसीएमसीच्या कामकाजाची पाहणी – NNL

Expenditure Inspectors Inspection ; खर्च निरीक्षकांकडून जिल्ह्यातील विभाग प्रमुखांचा आढावा एसएसटी, एफएसटी, सी-व्हिजील, एमसीएमसीच्या कामकाजाची पाहणी – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | नांदेड जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आलेले खर्च निरीक्षक ए. गोविंदराज व मयंक पांडे मंगळवार 22 ऑक्टोबरला दाखल झाले आहेत. त्यांनी 23 रोजी जिल्ह्यातील विविध विभाग प्रमुखांच्या बैठकी घेतल्या तसेच सी-व्हिजील कक्ष, निवडणूक खर्च कक्ष, माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती कक्ष (एमसीएमसी) कक्षाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, महानगरपालिकेचे मुख्यालेखा अधिकारी डॉ. जनार्दन पक्वाने यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. आज सर्वप्रथम खर्च निरीक्षक ए. गोविंदराज व मयंक पांडे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची त्यांच्या कक्षामध्ये भेट घेतली.त्यानंतर अप्पर जिल्हाध...
Election Expenditure Inspector for Legislative Assembly ; विधानसभेसाठी निवडणूक खर्च निरीक्षक ए. गोविंदराज, मयंक पांडे नांदेडमध्ये दाखल – NNL

Election Expenditure Inspector for Legislative Assembly ; विधानसभेसाठी निवडणूक खर्च निरीक्षक ए. गोविंदराज, मयंक पांडे नांदेडमध्ये दाखल – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड | नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून तामिळनाडू कॅडरचे ए. गोविंदराज (आयआरएस) तसेच गुजरात कॅडरचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे (आयआरएस) यांचे काल दि. 22 ऑक्टोबरला आगमन झाले असून त्यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला आहे. निवडणुकीमध्ये भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. 40 लक्ष रुपये विधानसभेसाठी तर 95 लक्ष लोकसभेसाठी खर्च मर्यादा आहे. निवडणुकीमध्ये पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी आयोगामार्फत अनेक प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहेत. निवडणुकीतील सभा, संमेलन, जेवनावळी, जाहिरातीवरील खर्च नियंत्रीत केल्या जाते. याशिवाय पैशाचे अमिष व अन्य बाबींबाबत कडक निगरानी केली जाते. निवडणूक निरीक्षकांमार्फत याबाबींची तपासणी केली जात असून ते नांदेड जिल्ह्यामध्ये याकाळात कायम रहिवाशी असतात. ए. गोविंद राज नायगाव, देगलूर, मुखेड व लोहासाठ...
The independence of the judiciary ; न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राहावे! – NNL

The independence of the judiciary ; न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राहावे! – NNL

लेख, नांदेड, मुंबई
अलीकडेच भारतीय सरन्यायाधीश यांनी त्यांच्या सेवानिवृत्ती ची घोषणा केली त्यामुळे काही बाबींवर प्रकाश टाकणे अगत्याचे वाटते. त्यांनी सेवानिवृत्ती घ्यावी की त्यागपत्र द्यावे? यावर काही व्हिडिओ ऐकण्यात आले ज्यामध्ये त्यांनी राजीनामा द्यावा अशीही अपेक्षा काहींनी व्यक्त केली. हो, हे अगदी खरे आहे, न्यायमुर्तीनी राजीनामाच द्यायला हवा. भारतीय संविधानातील कलम 32 हे अतिशय महत्वाचे आहे. या कलमास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचे ‘हृदय’ आणि ‘आत्मा’ असे म्हटले होते. हे कलम म्हणजे न्यायव्यवस्था (र्क्षीवळलळरीू) होय. भारतीय लोकशाहीचा हा तिसरा आधारस्तंभ होय. संसदेने पारित केलेला एखादा कायदा हा संविधानातील तरतुदींची विसंगत नाही ना? याचा अर्थ लावण्याची जबाबदारी ही न्याय व्यवस्थेची आहे. असे काही घडले तर न्यायव्यवस्था र्‘ीीे र्ोीींीं’ (स्वतः होवून) होऊन याबाबत निर्णय देईल अशी तरतूद घटनेत आहे. अलीकडे भा...
Rotary Club of Nanded : रोटरी क्लब नांदेड आणि नंदिग्राम यांची कार्यालयीन प्रांतपाल भेट संपन्न -NNL

Rotary Club of Nanded : रोटरी क्लब नांदेड आणि नंदिग्राम यांची कार्यालयीन प्रांतपाल भेट संपन्न -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| येथील रोटरी क्लब नांदेड आणि नंदिग्राम यांच्या कार्यालयीन प्रांतपाल भेट या कार्यक्रमात डिस्ट्रिक्ट चे प्रांतपाल डॉ सुरेश साबु ,सहप्रांतपाल मुरली भुतडा आणि नजीब पठाण हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते तर रोटरी क्लब नांदेड चे अध्यक्ष रो. डॉ संजय पतंगे आणि सचिव रो. सुरेश आंबुगेकर तसेच नंदीग्राम क्लब च्या अध्यक्षा रो. रेखा गरुडकर आणि सचिव डॉ सुरभी राठोर , नांदेड क्लब चे चार्टर प्रेसिडेंट डॉ. वेंकटेश काब्दे यांच्या हस्ते प प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले . यावेळी दोन्ही अध्यक्ष आणि सचिव यांनी उपस्थितांना आपल्या क्लब तर्फे झालेल्या समाज उपयोगी प्रकल्पाची माहिती सांगितली. तसेच या कार्यक्रमात रोटरी क्लब नांदेड तर्फे जल स्वराज्य प्रकल्प संस्था नगडारवाडी , अॅड.. गजानन पिंपरखेडे , श्री विपुल राठोड , डॉ. अशोक कलंत्री , श्री.नागनाथ गुज्जलवार, डॉ. अनिल साखरे आणि नंदिग्राम क्लब तर्फे...
Election system ready for postal voting : टपाली मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज…. NNL

Election system ready for postal voting : टपाली मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज…. NNL

नांदेड, महाराष्ट्र
राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यात एका टप्प्यात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्याची निवडणूक यंत्रणा कार्यवाही करत आहे. राष्ट्रीय कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी, सैन्यदलातील अधिकारी, दिव्यांग  तसेच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक  यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचारी, पोलीस, सैन्य दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सोय देण्यात येते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २ लाख ६७ हजार २५० टपाली मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकांसाठी नियुक्त अधिकार...
Honoring youth voters  : नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने युवक मतदारांचा सन्मान -NNL

Honoring youth voters : नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने युवक मतदारांचा सन्मान -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| लोकशाही सक्षम करण्यासाठी युवकांनी आळस न करता प्रथम आपले नाव मतदार यादीत नोंदविणे आवश्यक आहे. अशा अनेक नवमतदार तरुणांनी यंदा प्रथमच आपले नाव मतदार यादीत नोंदवून इपिक कार्ड सुध्दा प्राप्त केले आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात आज नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने प्रतिभा निकेतन महाविद्यालयात घेण्यात आलेल्या मतदार जनजागृती कार्यक्रमात कु.वैष्णवी वसंतकुमार साहू व गौरांक ओमप्रकाश दरक या दोन तरुण मतदारांचे कौतुक व अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर हे तर विशेष अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. घनश्याम येळणे, स्वीप सदस्य प्रा.राजेश कुलकर्णी, प्रा.विजय तरोडे, लेफ्टनंट प्रा.डॉ. किशोर इंगळे, मुख्याध्यापक बालासाहेब कच्छवे, सुनील दाचावार, संजय भालके, कविता जोशी आणि सारिका आचमे उपस्थित होते. ...
Maroti Kakandikar passed away : मारोती काकांडीकर यांचे निधन -NNL

Maroti Kakandikar passed away : मारोती काकांडीकर यांचे निधन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| शहरातील श्रावस्ती भागातील रहिवाशी मारोती संभाजीराव हानवते (काकांडीकर) यांचे बुधवार दिनांक 23रोजी दुपारी 3 वाजता हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. ते मृत्यू समयी 46 वर्षाचे होते. त्यांच्या पश्‍चात वडिल, पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, दोन भाऊ, भावजयी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी दि.24 रोजी सकाळी 11.30 वाजता त्यांच्या श्रावस्ती नगर येथील राहत्या घरुन निघणार आहे. त्यांच्यावर गोवर्धन घाट परिसरातील शांतीधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ते पत्रकार अशोक काकांडीकर यांचे लहान बंधु होत....
Com. Arjun Ade : भव्य रॅली काढून किनवट येथे माकपने उमेदवार कॉ.अर्जुन आडे यांचा अर्ज दाखल केला -NNL

Com. Arjun Ade : भव्य रॅली काढून किनवट येथे माकपने उमेदवार कॉ.अर्जुन आडे यांचा अर्ज दाखल केला -NNL

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे| माहूर - किनवट विधानसभा मतदार संघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉ. अर्जुन आडे यांचा उमेदवारी अर्ज दि.२३ ऑक्टोबर रोजी सहाय्यक निवडणूक अधिकारी मेघना कावली यांच्याकडे दाखल केला. यावेळी रेल्वे स्टेशन परिसरातून हजारो लोकांची भव्य फेरी काढण्यात आली. आणि कलावती गार्डन येथे मेळावा घेण्यात आला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाच्या वतीने राज्य कमिटीचे सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभने, उमेदवार कॉ. अर्जुन आडे, डॉ.बाबाराव डाखोरे, कॉ.विनोद गोविंदवार,कॉ.मोहन जाधव आदींची उपस्थिती होती. शहरात रॅली काढून सभा घेण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.शंकर सिडाम हे होते. रॅली मध्ये कॉ किशोर पवार, कॉ उज्वला पडलवार, कॉ जनार्दन काळे,कॉ प्रल्हाद चव्हाण,कॉ शिवाजी गायकवाड, कॉ.अंकुश अंबुलगेकर,कॉ. शै...
error: Content is protected !!