नवीन नांदेड | महाराष्ट्र क्रीडा युवक सेवा संचनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड. यांच्या संयुक्त विद्यामानाने घेण्यात आलेल्या शालेय विभागीय स्तरावरील बॉक्सिंग क्रीडा स्पर्धे साठी इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेजच्या चार खेळाडू (19 वर्षाखालील)लातूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून यात नागेश बोंबले ,ओमकार मस्के, कु.सुप्रिया मोरे,कुं साक्षी हनुमंते इत्यादी खेळाडूचा आपापल्या गटामध्ये जिल्ह्यात प्रथम येऊन उद्या होणाऱ्या शालेय विभागीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी रवाना झाले.
या यशाबद्दल सर्व खेळाडूचे शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण उपाध्यक्ष सौ.अमिताताई चव्हाण ,सचिव डी.पी.सावंत, सहसचिव शेंदारकर , कोषाध्यक्ष निंबाळकर, मुख्याध्यापक श्री जी.एम.शिंदे, प्राचार्य डॉ.बी.एल घायल,सुपरवायझर प्रा.चंदेल यु .सी,डॉ.संजय शिंदे ,प्रा. सातानुरे , सौ.फाजगे ,कोठुळे,डॉ.संजय देशमुख, प्रा. मोरे प्रा.नितीन दारमोड , प्रा. संतोष हापगुंडे सर ,श्री सूर्यवंशी, सौ.फुलारी मॅडम ,श्री सतीश कुकुटला , स्वप्निल पाताळे ,सौ. स्वामी मॅडम इत्यादीने खेळाडूचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शन प्रा. डॉ. रमेश नांदेडकर यांचे योग्य मार्गदर्शन लाभले.