नांदेडक्राईमव्हिडीओ

theft of lakhs by thieves : देव दर्शनाला गेले अन् चोरट्यांकडून लाखोंची घरफोडी; जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील हनुमान मंदीर चौकातील जामा मज्जीदकडे जाणार्‍या रोडवरील घरातील सर्व सदस्य देव दर्शनाला बाहेरगावी गेलेले असल्याने राञी उशीरा घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांची घरफोडी झाल्याचा प्रकार घडकीस आला आहे.याबाबत सिंदखेड पोलिस ठाण्यात जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IMG 20250210 WA0055 theft of lakhs by thieves : देव दर्शनाला गेले अन् चोरट्यांकडून लाखोंची घरफोडी; जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल

याबाबत मिळालेली माहिती अशी की,नारायण उत्तरवार हे येथील जय योगेश्वर ट्रेडींग कंपणीचे काम पाहतात,त्यांचे घर हनुमान मंदीर चौक जामा मज्जीद रोडवर आहे.नारायण उत्तरवार हे सहकुंटूब मागील २ ते ३ दिवसापासून प्रयागराज येथील कुंभ मेळाव्यासाठी गेले होते.देवदर्शन करुण ते वाई बाजार येथे दि.१० फेब्री.रोजी सकाळी ६ वाजता आले.व घरी पोहचले असता घराचे मुख्य द्वार उघडे दिसून आले,तर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले.

IMG 20250210 WA0047 theft of lakhs by thieves : देव दर्शनाला गेले अन् चोरट्यांकडून लाखोंची घरफोडी; जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल

बेडरूममधील सोन्याचे दागिने, त्याच्या पावत्या व रोख रक्कम चोरी झाल्याचे आढळून आले. नारायण उत्तरवार यांनी सिंदखेड पोलीसात तक्रार दिली असून सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास करीत आहे. याकामी नांदेडचे थम्स पथक व पोलीस श्वान पथकातील हवलदार जोंधळे,चालक हवलदार केंद्रे,श्वान जून,यांनी घटना स्थळावर जावून पाहणी केली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!