हिमायतनगर,अनिल मादसवार| पुढील वर्ष ओम नमः शिवाय….नामजपाचे तिसरं वर्ष आहे. यंदा या जपामध्ये तुम्हाला सामील करून घेण्यासाठी महान घ्यावी लागली. पुढील वर्षी स्वतःहून श्रावण महिन्यात आयोजित होणाऱ्या ओम नमः शिवाय यज्ञात जास्तीत जास्त पुरुष व महिलांनी सहभागी होऊन पुण्यकर्म पदरी पडून घ्यावं. असा दिव्या संदेश परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी देऊन समारोपाला उपस्थित झालेल्या सर्वाना खूप खूप आशीर्वाद दिले.


संबंध भारतात एकमेव समजल्या जाणाऱ्या हिमायतनगर वाढोणा येथील इतिहासकालीन श्री परमेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ओम नमः शिवाय नामजाप यज्ञाचा शुभारंभ दि.०५ ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी ०६ वाजता परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. ७१ वर्षाने आलेल्या श्रावण महिना सोमवारी आणि समारोप देखील सोमवारी होत असल्याने या महिनाभर अखंडपणे नामजप यज्ञ करण्याला विशेष महत्व आले होते. नामजप यज्ञ दोन सत्रात म्हणजे सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत महिला मंडळी आणि सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत पुरुष मंडळी सहभागी झाली होती. ओम नमः शिवाय नामाचा जयजयकार करत बिल्वपत्र अर्पण करून परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन अनेकांनी या यज्ञात दररोज सहभाग घेतला. अखंड महिनाभर या यज्ञात पंचक्रोशीतील भाविकांनी भजनी मंडळींनी सहभाग घेऊन मानव जन्माच सार्थक करून घेतलं. अखंडितपणे ओम नमः शिवाय नामजप यज्ञाला महिना पूर्ण झाला असून, आज मंगळवारी सकाळी 11 वाजता परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत अनुष्ठान सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

श्री परमेश्वर मंदिरामध्ये बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांचे आगमन होताच टाळमृदंगाच्या वाणीत महिला पुरुष भजनी मंडळांन स्वामीजींचे जंगी स्वागत करीत यज्ञ अनुष्ठानच्या शिवपती मंदिरापर्यंत मिरवणूक काढली. बालयोगी व्यंकट स्वामीजीं व आमदार जवळगावकर यांच्या हस्ते यज्ञ अनुष्ठान कलशाच पूजन करून उचलण्यात येऊन श्री परमेश्वर मंदिराच्या संचालिका लताताई मुलंगे यांच्या डोक्यावर दिला. लागलीच ओम नमः शिवाय…. ओम नमः शिवाय…. नामाचा गजर करत शेकडो वर्षांपूर्वीच्या हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन श्रीचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर नियोजित समारोप सोहळ्याचा मंचावर बालयोगी व्यंकट स्वामी महाराज विराजमान झाले.

यावेळी त्यांच्यासोबत हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जळगावकर, श्री परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीराचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंतराव देवकते, यांच्यासह पूजेचे मानकरी मायंबा होळकर, परमेश्वर तिप्पनवार, सुभाष बलपेवाड यांनी सपत्नीक बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांचे पाद्यपूजन करून पुष्पहाराने स्वागत केले. यानंतर श्री परमेश्वर मंदिरातर्फे महावीरचंद श्रीश्रीमाळ, आमदार जवळगावकर यांनी देखील स्वामीजींचा पुष्पहाराणे स्वागत करून दर्शन घेतले. यावेळी उपेक्षितांना मार्गदर्शन करताना बालयोगी व्यंकटस्वामी महाराजांनी उपेक्षित सद्भक्तांना पाच मिनिट “ओम नमः शिवाय” नाम जप करण्यास सांगून समारोप झाल्याचे जाहीर केले. यावेळी श्री परमेश्वर मंदिर कमेटीकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे कौतुक करत यापुढे अशेच धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना केली. तसेच पुढील वर्षी या यज्ञाला तीन वर्ष होत असून, यज्ञात सामील होण्यासाठी कोणालाही बोलाविण्याची आवश्यकता राहू नये नामजप केल्याने मनुष्य जन्माचे सार्थक होते त्यासाठी सर्वांनी यात पुढील वर्षी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी हजारोंच्या संख्येने हिमायतनगर शहरातील महिला पुरुष भाविक भक्त “ओम नमः शिवाय” नामजप यज्ञ सांगता सोहळ्याला उपस्थित झाले होते. त्यानंतर लगेच आमदार जवळगावकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाची सुरुवात बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आली. श्रावण मास आणि इतर कोणत्याही दिवशी अन्नदान केल्याने पुण्य प्राप्त होते असा संदेश स्वामीजींनी देऊन सर्वांनी अन्नदान व आपल्या परीने १ रुपया का होईना दानधर्म करून पुण्यकर्मात सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी परमेश्वर मंदिराचे संचालक, यज्ञ पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतलेले सर्व स्वयंसेवक व भाविक उपेक्षित होते. यावेळी हिमायतनगर शहरासह तालुक्यातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


