HomeकरियरDr. Sangita Chandrakant Deshmukh | जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. संगिता चंद्रकांत...

Dr. Sangita Chandrakant Deshmukh | जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख रुजू – NNL

नांदेड| जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख यांची पदस्थापना शासन आदेशान्वये करण्यात आली आहे. त्या अन्वये डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख या 16 जुलै 2024 रोजी जिल्हा परिषद नांदेड येथे जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर रुजू झाल्या आहेत.

आरोग्य सेवेतील कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून यापुर्वी त्या वाशिम येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व सांगली येथे जिल्हा हिवताप अधिकारी तसेच सातारा येथे तालुका आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत होत्या.

DR sangita deshmukh 2 Dr. Sangita Chandrakant Deshmukh | जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख रुजू - NNL

जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड या पदावर रुजू झाल्यानंतर त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांचा विविध आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेवून मार्गदर्शन केले. या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना केल्या. जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील असेही त्यांनी बैठकीत सांगितले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments