HomeनांदेडWhere did the nine lakh rupees of the Muslim hall go? |...

Where did the nine lakh rupees of the Muslim hall go? | हदगाव शहरातील मुस्लीम सभागृहाचे नऊ लाख रु गेले कुठे… NNL

हदगाव शहरातील मुस्लीम सभागृहाचे नऊ लाख रु गेले कुठे…

हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहारातील मुस्लीम समाजाच्या विविध सामाजिक कामाकरिता शासनाकडुन आलेला निधी योग्यरित्या खर्च करण्यात आलेला नसुन, शासनाने मंजुर केलेल्या निधीमध्ये काही राजकीय नेत्याच्या जवळच्यानी विविध कञाटदाराच्या नावे थातुर मातुर कामे करुन बिले उचलली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम सभागृहाच्या कामाकरिता वैशिष्टयेपुर्ण योजने अतर्गत आलेला नऊ लाख 31हजार रुपायाचा निधी नेमणूक कुठे खर्च करण्यात आला. या बाबतीत न.पा.प्रशासन किवा सार्वजनिक बाधकाम विभाग अनेकवेळा पञव्यव्हार करुन ही माहीती देण्यात येत नाही. ज्या मुस्लीम सभागृहाचे करिता जो निधी खर्च करण्यात आलेला आहे. त्या नियोजित जागेवर एक विट सुद्धा बसविलेले नाही. त्यामुळे मंजूर झालेले लाखो रुपये नेमके कुठं गेले. या बाबत आता विद्यमान आमदार व पालकमंञ्यानीच शोध घ्यावा अशी मागणी होत आहे.

या बाबतीत थोडक्यात माहीती अशी की, तात्कालिक जिल्हाआधिकारी नादेड यांनी 13 आगष्ट 2019 च्या पञानूसार मुस्लिम समाजाच्या इदगाह शादीखाना व जुना बस्थानकाच्या परिसरात मुस्लिम समाजा करिता सभागृह बाधकाम करण्या करणे बाबतीत 1,0979.405 ( एक कोटी नऊ लक्ष एकोणऐशी हजार चारशे पाच) इतकी रक्कम कार्यकारी अभियंता सा.बा.विभाग भोकर यांना पञाद्वरे वैशिष्ट्यपुर्ण योजने अतर्गत वरील प्रस्तावित केलेल्या कामास दिली होती. यास हदगाव नगरपरिषदेस मंजुर निधीतून प्रशासकीय मान्याता देण्यात आलेली होती. यापैकी सदरिल रक्कम विविध कामात खर्च करण्यात आलेली असुन, मुस्लिम समाजच्या सभागृहाच्या बाधकामा करिता 9लाख 31 हजार रुपये कुठे खर्च करण्यात आले.या बाबतीत न.पा.प्रशासन किवा सा. बा. विभाग वारंवार लेखी स्वरुपात माहीती विचारण्यात आली आसता काहीच माहीती देत नाही.

सदर कामे कोणत्या विभागा मार्फत झालेले आहे, माञ या बाबतीत प्रशासनाकडुन टोलवाटोलवी होत आहे. मुस्लिम सभागृहाच एक रुपायाचही काम झालेल नाही तर 9लाख 31हजार निधी गेला कुठे.? आणि कुठे खर्ची घालाण्यात आला या बाबतीत मुस्लिम समाज बांधवात प्रशासन व लोकप्रतिनिधी विषयी नाराजी दिसुन येत आहे.

आमदार व पालकमंञ्ञी लक्ष घालतील काय …?
हदगाव शहरातील मुस्लिम समाजाच्या इदगाह (टेकडीवर) नमाज पडण्या करिता ओट्याचे काम न.पा. अतर्गत शादीखान्याचे दुरुस्तीचे कामे थातुर मातुर करुन लाखो रुपये उचलण्यात आलेली आहेत. माञ जिथे एक रुपायाचे पण काम झालेले नाही. त्यामुळे मंजुर रक्कम 9लाख 31हजार कुठे खर्ची घालण्यात आली. या बाबतीत आता स्वत विद्यमान आमदार व पालकमंञ्यानीच लक्ष घालावे आणि याचा हिशोब विचारावा अशी मागणी होतांना दिसुन येत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments