Where did the nine lakh rupees of the Muslim hall go? | हदगाव शहरातील मुस्लीम सभागृहाचे नऊ लाख रु गेले कुठे… NNL
हदगाव शहरातील मुस्लीम सभागृहाचे नऊ लाख रु गेले कुठे...
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहारातील मुस्लीम समाजाच्या विविध सामाजिक कामाकरिता शासनाकडुन आलेला निधी योग्यरित्या खर्च करण्यात आलेला नसुन, शासनाने मंजुर केलेल्या निधीमध्ये काही राजकीय नेत्याच्या जवळच्यानी विविध कञाटदाराच्या नावे थातुर मातुर कामे करुन बिले उचलली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम सभागृहाच्या कामाकरिता वैशिष्टयेपुर्ण योजने अतर्गत आलेला नऊ लाख 31हजार रुपायाचा निधी नेमणूक कुठे खर्च करण्यात आला. या बाबतीत न.पा.प्रशासन किवा सार्वजनिक बाधकाम विभाग अनेकवेळा पञव्यव्हार करुन ही माहीती देण्यात येत नाही. ज्या मुस्लीम सभागृहाचे करिता जो निधी खर्च करण्यात आलेला आहे. त्या नियोजित जागेवर एक विट सुद्धा बसविलेले नाही. त्यामुळे मंजूर झालेले लाखो रुपये नेमके कुठं गेले. या बाबत आता विद्यमान आमदार व पालकमंञ्यानीच शोध घ्यावा अशी मागणी होत आहे...
