Reverend Balayogi Venkat Swami : पुढील वर्षी स्वतःहून “ओम नमः शिवाय” यज्ञात जास्तीत जास्त सद्भक्तांनी सहभागी व्हावं – परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी -NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| पुढील वर्ष ओम नमः शिवाय....नामजपाचे तिसरं वर्ष आहे. यंदा या जपामध्ये तुम्हाला सामील करून घेण्यासाठी महान घ्यावी लागली. पुढील वर्षी स्वतःहून श्रावण महिन्यात आयोजित होणाऱ्या ओम नमः शिवाय यज्ञात जास्तीत जास्त पुरुष व महिलांनी सहभागी होऊन पुण्यकर्म पदरी पडून घ्यावं. असा दिव्या संदेश परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी देऊन समारोपाला उपस्थित झालेल्या सर्वाना खूप खूप आशीर्वाद दिले.
संबंध भारतात एकमेव समजल्या जाणाऱ्या हिमायतनगर वाढोणा येथील इतिहासकालीन श्री परमेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ओम नमः शिवाय नामजाप यज्ञाचा शुभारंभ दि.०५ ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी ०६ वाजता परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. ७१ वर्षाने आलेल्या श्रावण महिना सोमवारी आणि समारोप देखील सोमवारी होत असल्याने या महिनाभर अखंडपणे नामजप यज्ञ करण...
