Gurupurnima celebration of Art of Living is over | आर्ट ऑफ लिव्हिंगचा गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न – NNL

नांदेड| गुरू गोविंद दोनो खडे काके लागूं पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो मिलाएं. जीवनाच्या वाटेवरील मार्गाक्रमण सुखदायक करणाऱ्या गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नांदेड परिवाराने भक्तीमय वातावरणात धमाल महासत्संग व प्रसाद वाटप करुन गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.


लग्न, वाढदिवस, मुंज, सोयरिक, साखरपुडा, इत्यादी कौटुंबिक सोहळे असो की बिझिनेस मिट, कॉर्पोरेट वर्कशॉप, सेल्स ग्रोथ ट्रेनिंग, इत्यादी कोणत्याही इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रातील अग्रेसर ब्रैंड बनलेल्या महेंद्र गायकवाड व सतिष गोविंदवार संचलित स्वागत लॉन्स एन्ड बैंक्वेट हॉल येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे टिचर, गुरुपुजा पंडीत, व्हॉल्युंटियर्स व साधकांनी आपल्याला लाभलेल्या मानवी जन्माचा महाउत्सव साजरा करुन प्रत्येक क्षण आनंदात व्यतित करता येतो याची अनुभूती उपस्थितांना दिली.

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिव्हिंग नांदेड टिमने येत्या २२ जुलै पासून ख्यातनाम एओएल टिचर योगेश शेलार यांच्यासमवेत मोरया टॉवर्स काबरा नगर नांदेड येथे तर २५ ऑगस्ट २०२४ पासून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ रोहित सबरवाल यांच्या समवेत स्वागत लॉन्स, एअरपोर्ट रोड, सांगवी येथे धमाल डायनामिझम फॉर सेल्फ एंन्ड नेशन (डिएसएन) कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे.


जुलै महिन्याच्या कोर्सची अधिक माहिती घेण्यासाठी इच्छुकांनी 9420461608 व 9421105027 तथा ऑगस्ट महिन्याच्या दिव्य समाज का निर्माण या कोर्समध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी 9421377555 किंवा 6386245907 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. साधना, सेवा, सत्संग व ध्यान या माध्यमातून चैतन्य व उर्जा वृध्दींगत करणाऱ्या देखण्या सोहळ्याच्या शेवटी आर्ट ऑफ लिव्हिंगचे नांदेड जिल्हा टिचर कोऑर्डिनेटर केशवराज जाधव यांनी सर्व उपस्थितांचे व सत्संग टिमचे आभार मानले.




