Gurupurnima celebration of Art of Living is over | आर्ट ऑफ लिव्हिंगचा गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न – NNL
नांदेड| गुरू गोविंद दोनो खडे काके लागूं पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो मिलाएं. जीवनाच्या वाटेवरील मार्गाक्रमण सुखदायक करणाऱ्या गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नांदेड परिवाराने भक्तीमय वातावरणात धमाल महासत्संग व प्रसाद वाटप करुन गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
लग्न, वाढदिवस, मुंज, सोयरिक, साखरपुडा, इत्यादी कौटुंबिक सोहळे असो की बिझिनेस मिट, कॉर्पोरेट वर्कशॉप, सेल्स ग्रोथ ट्रेनिंग, इत्यादी कोणत्याही इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रातील अग्रेसर ब्रैंड बनलेल्या महेंद्र गायकवाड व सतिष गोविंदवार संचलित स्वागत लॉन्स एन्ड बैंक्वेट हॉल येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे टिचर, गुरुपुजा पंडीत, व्हॉल्युंटियर्स व साधकांनी आपल्याला लाभलेल्या मानवी जन्माचा महाउत्सव साजरा करुन प्रत्येक क्षण आनंदात व्यतित करता येतो याची अनुभूती उपस्थितांना दिली.
गुरुदेव श्री श्री ...
