नांदेडकरियर

Organizing a felicitation : पोखरभोसी येथे उद्या भूमिपुत्र “नायक” व्यंकटी ताटे यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन -NNL

उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर येथून जवळच असलेल्या पोखरभोसी ता .लोहा येथील भूमिपुत्र ” नायक ” व्यंकटी भगवान ताटे यांनी भारतीय सैन्यदलात १७ वर्ष प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल व परभणी पोलीस दलात निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने दि . ४ सप्टेंबर बुधवारी रोजी भव्य सत्काराचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी ह.भ.प.नागोराव महाराज भोसले गुरूजी ( मानखेड ) यांच्या किर्तनाचे आयोजन सकाळी ९ ते ११ या वेळेत आहे .या प्रसंगी शिवव्याख्याते प्रा.संभाजी नवघरे यांची उपस्थिती लाभणार आहे तर या भव्य दिव्य नागरी सत्काराला प्रमुख पाहूणे म्हणून कॅप्टन प्रकाश कस्तूरे , कॅप्टन किशन कपाळे , कॅप्टन संजय कदम, कॅप्टन शिवाजीराव जाधव , कॅप्टन विठ्ठलराव कदम (अध्यक्ष जिल्हा सैनिक बोर्ड नांदेड ), निलेश राठोड ( शौर्य अॅकेडमी नांदेड ), सचिन गोमासे ( शौर्य अॅकेडमी नांदेड ) यांची उपस्थिती लाभणार आहे.

दि.४ सप्टेंबर रोज बुधवार ह्या दिवशी होणा-या भव्य नागरी सत्कार प्रसंगी पोखरभोसी येथील भूमिपुत्र “नायक ” व्यंकटी भगवान ताटे यांची मिरवणूक ( रॅली ) सकाळी १० ते २ वाजेपर्यंत गावातील प्रमुख मार्गावरून गावकऱ्यांच्या वतिने काढण्यात येणार आहे तरी पंचक्रोशीतील देशभक्त नागरिकांनी भव्य नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन किशन व्यंकटी ताटे ,सुधाकर लक्ष्मण ताटे ,दयानंद भगवान ताटे व समस्त गावकरी मंडळीं यांनी केले आहे .ङ

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button