Organizing a felicitation : पोखरभोसी येथे उद्या भूमिपुत्र “नायक” व्यंकटी ताटे यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन -NNL
उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर येथून जवळच असलेल्या पोखरभोसी ता .लोहा येथील भूमिपुत्र " नायक " व्यंकटी भगवान ताटे यांनी भारतीय सैन्यदलात १७ वर्ष प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल व परभणी पोलीस दलात निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने दि . ४ सप्टेंबर बुधवारी रोजी भव्य सत्काराचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी ह.भ.प.नागोराव महाराज भोसले गुरूजी ( मानखेड ) यांच्या किर्तनाचे आयोजन सकाळी ९ ते ११ या वेळेत आहे .या प्रसंगी शिवव्याख्याते प्रा.संभाजी नवघरे यांची उपस्थिती लाभणार आहे तर या भव्य दिव्य नागरी सत्काराला प्रमुख पाहूणे म्हणून कॅप्टन प्रकाश कस्तूरे , कॅप्टन किशन कपाळे , कॅप्टन संजय कदम, कॅप्टन शिवाजीराव जाधव , कॅप्टन विठ्ठलराव कदम (अध्यक्ष जिल्हा सैनिक बोर्ड नांदेड ), निलेश राठोड ( शौर्य अॅकेडमी नांदेड ), सचिन गोमासे ( शौर्य अॅकेडमी नांदेड ) यांची उपस्थिती लाभणार आहे.
...
