नांदेड़। नांदेड शहरात श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त येथील दुष्ट दमन क्रीडा युवक मंडळ नांदेड तर्फे आयोजित आणी संचालित अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी टोर्नामेंट स्पर्धेस ता. 30 डिसेम्बर रोजी सकाळी प्रारंभ होत आहे. या स्पर्धा 6 जानेवारी पर्यंत चालणार आहेत. यंदा स्पर्धेचे 51 वें वर्ष असून स्पर्धेत देशातील प्रसिद्ध नामवंत हॉकी संघ सहभागी होत आहेत अशी माहिती दुष्ट दमण क्रीडा युवक मंडळाचे अध्यक्ष व माजी नगर सेवक सरदार गुरमितसिंघ नवाब (डिम्पल) यांनी दिली.
श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या नावाने सतत चालणारी आणि महाराष्ट्रात नामवंत अशा या हॉकी स्पर्धेचे उदघाटन ता. 30 डिसेम्बर रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान खालसा हायस्कुल मिनी स्टेडियम मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धेची तयारी सुरु असून मैदान तयार करण्याचे कार्य अंतिम टप्यात आहेत. स्पर्धेचे सामने साखळी आणि बाद अशा पद्धतीने खेळविले जाणार आहे. स्पर्धेत नोंदणीकृत आणी राष्ट्रीय गाजलेल्या एकूण सोळा संघांना स्थान देण्यात आले आहे.
या जागतिक दर्जाच्या स्पर्धेसाठी खालसा हायस्कुल मिनी स्टेडियमचा मैदान सज्ज होत आहे. विजेता संघाना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि इतर पारितोषिके देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक सामन्यात सामनावीर पारितोषिक देण्यात येईल. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू आणि गोलकीपर यांना ही पारितोषक देऊन गौरव करण्यात येणार आहे. स्पर्धे निमित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे नांदेड नगरीत आगमन होणार आहे. खेळाडूंच्या राहण्या व खाण्याची सोय आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिरोमणी दुष्ट दमन क्रीडा युवक मंडळ अध्यक्ष व नगर सेवक सरदार गुरुमितसिंघ नवाब, उपाध्यक्ष जितेंदरसिंघ खैरा, सचिव हरविंदरसिंघ कपूर, कोषाध्यक्ष हरप्रीतसिंघ लांगरी, सहसचिव संदीपसिंघ अखबारवाले, सदस्य महिन्दरसिंघ लांगरी, जसपालसिंघ काहलों, महिंदर सिंघ गाडीवाले, अमरदीपसिंघ महाजन, विजय नंदे आणी सर्व खेळाडू परिश्रम घेत आहेत. सतत आठ दिवस चालणाऱ्या स्पर्धेत खेळ प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.