Friday, May 15

Tag: to be played for eight days

Hockey tournament ; अखिल भारतीय गोल्ड अण्ड सिल्वर कप हॉकी स्पर्धा 30 डिसेम्बर पासून आठ दिवस हॉकीचे सामने रंगणार -NNL

Hockey tournament ; अखिल भारतीय गोल्ड अण्ड सिल्वर कप हॉकी स्पर्धा 30 डिसेम्बर पासून आठ दिवस हॉकीचे सामने रंगणार -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड़। नांदेड शहरात श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त येथील दुष्ट दमन क्रीडा युवक मंडळ नांदेड तर्फे आयोजित आणी संचालित अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी टोर्नामेंट स्पर्धेस ता. 30 डिसेम्बर रोजी सकाळी प्रारंभ होत आहे. या स्पर्धा 6 जानेवारी पर्यंत चालणार आहेत. यंदा स्पर्धेचे 51 वें वर्ष असून स्पर्धेत देशातील प्रसिद्ध नामवंत हॉकी संघ सहभागी होत आहेत अशी माहिती दुष्ट दमण क्रीडा युवक मंडळाचे अध्यक्ष व माजी नगर सेवक सरदार गुरमितसिंघ नवाब (डिम्पल) यांनी दिली. श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या नावाने सतत चालणारी आणि महाराष्ट्रात नामवंत अशा या हॉकी स्पर्धेचे उदघाटन ता. 30 डिसेम्बर रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान खालसा हायस्कुल मिनी स्टेडियम मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धेची तयारी सुरु असून मैदान तयार करण्याचे कार्य अंतिम टप्यात आहेत...
error: Content is protected !!