District level workshop : एफसीए अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

नांदेड| विविध शासकीय, निमशासकीय कामांसाठी वनखात्याच्या जमिनी प्रदानाबाबत वन संरक्षण अधिनियम, (सुधारणा) 2023 बाबत अनुसरायची कार्यपद्धतीबाबत आज कार्यशाळा संपन्न झाली. ही कार्यशाळा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनाच्या कॅबिनेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपवनसंरक्षक केशव वाबळे यासोबत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, महावितरण तसेच इतर विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

ही कार्यशाळा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत वन विभागाच्या परवानगी प्रलंबित राहू नयेत, यामुळे जिल्ह्यातील कोणताही प्रकल्प अपूर्ण राहू नये यासाठी आयोजित केली होती. या कार्यशाळेस उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी वनखात्याकडे मंजुरीसाठी परिवेश पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव कशाप्रकारे करायचा व वन जमिनीच्या अनुषंगाने ना हरकत बाबत विस्तृत मार्गदर्शन केले.

गायरान जमिनीच्या जीईओ फेनसिंगबाबत कार्यशाळा संपन्न
जिल्ह्यात वाटप करावयाच्या शिल्लक असणाऱ्या गायरान जमिनीबाबत गुगल अर्थ प्रणालीचा वापर करून शासकीय जमिनीचे जीईओ फेनसिंगबाबत कार्यशाळा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आयोजीत करण्यात आली होती. या कार्यशाळेत जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व ग्राममहसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आदींची उपस्थिती होती.

शासकीय जमिनीचा एकत्रित डाटा बँक तयार व्हावा व त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पेतून वरील कार्यशाळा घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या मिशन 150 दिवस अंतर्गत शासकीय कामामध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात सदर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या कार्यशाळेस जालना येथून विशेष उपस्थित राहिलेले ग्राम महसूल अधिकारी दुर्गेश गिरी यांनी मार्गदर्शन केले.

इस्राईलमध्ये 5 हजार रोजगाराच्या संधी
जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसाठी परदेशात रोजगार मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या माध्यमातून इस्त्राईल देशात “होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स”च्या 5 हजार पदासाठी भरती होणार आहे. अर्जदाराने संकेतस्थळावर अर्ज करून नाव नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

या भरतीसाठी महाराष्ट्र नर्सिग कौन्सिल मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर भेट देऊन सविस्तर कार्यविवरण, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज प्रक्रियेची माहिती पाहून अर्ज सादर करावा. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यात जागरुकता मोहिम राबवून पात्र उमेदवारांना अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक सहाय्य केले जाणार आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button