Farmar suicide : कोकानाईक तांडा येथील तरुण शेतकऱ्याची औषध प्राशन करून आत्महत्या

हिमायतनगर| तालुक्यातील कांडली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोका नाईक तांडा येथील तरुण शेतकऱ्यांनी रविवारी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सदरील शेतकऱ्याला उपचारासाठी भोकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील कोका नाईक तांडा येथील तरुण शेतकरी अतुल रमेश जाधव वय 30 या शेतकऱ्यांनी रविवारी शेतामध्ये दिवसभर काम करून घरी आले आले होते. गेले अनेक वर्षापासून शेती कर्ज व इतर कर्जाचा बोजा कधी फिटणार या विवंचनेत राहून सततच्या नापिकीमुळे होत असलेल्या कर्जा पाई या तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे. औषध प्राशन केल्याचे माहीत होताच गावकऱ्यांनी सदरील शेतकऱ्यांस भोकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

परंतु उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे डाक्टरांनी सांगितले आहे. सदरील शेतकऱ्याच्या पश्चात आई-वडील ,पत्नी ,दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्याच्यावर रविवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले आहे सदरील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत देण्याची मागणी कोका नाईकतांडा येथील नागरिकांनी केली आहे.या घटनेची भोकर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button