HomeनांदेडDistrict Collector takes note : बांधकाम व घरेलू कामगारांच्या मोर्चाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली...

District Collector takes note : बांधकाम व घरेलू कामगारांच्या मोर्चाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

नांदेड| अप्पर दंडाधिकारी महेश वडदकर यांनी सीटू कामगार संघटनेच्या मोर्चाची दखल घेतली असून २० जून रोजी सहाय्यक कामगार आयुक्त व सर्व सरकारी कामगार अधिकारी यांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीला बोलावण्यात आले आहे.

दि. १२ जून रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) आणि प्रगती महिला पुरुष बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो कामगारांचा आक्रोश मोर्चा काढून नोंदणी अधिकारी यांची मनमानी थांबवावी व नूतनिकरण करावे तसेच सर्व नोंदीत बांधकाम व घरेलू कामगारांना भांडे संच व साहित्य किट देण्यात यावी ही मागणी करण्यात आली होती.

सदरील मोर्चाची दखल जिल्हाधिकारी व निवासी उप जिल्हाधिकारी यांनी घेतली असून दि.२० जून रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली आहे. तसे लेखी पत्र अप्पर जिल्हादंडाधिकारी यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले असून सहाय्यक कामगार आयुक्त श्री अनिकेत थोरात यांच्या सह सर्व नोंदणी अधिकारी यांना देण्यात आले आहे.

IMG 20250619 WA0002 District Collector takes note : बांधकाम व घरेलू कामगारांच्या मोर्चाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

सदरील पत्राची प्रत सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांना माहितीस्तव देण्यात आली असून बैठकीस उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे तसेच मागील मागण्याचे सर्व निवेदने निरीक्षणासाठी सोबत ठेवावेत असे कळविण्यात आले आहे. कामगार कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सेवापुस्तिका तसेच बायोमॅट्रिक हजेरी पट उपलब्ध करून द्यावा अशी मागणी कॉ.गंगाधर गायकवाड हे उपरोक्त बैठकीत करणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डीले आणि निवासी उप जिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या दालनात कामगार कार्यालयातील अनियमितता तसेच सोईस्कर पद्धतीने देण्यात आलेले अप्रोव्हल हे व इतर मुद्दे उपस्थित होणार असल्यामुळे कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांना सर्व तयारीनीसी बैठकीला जावे लागणार आहे. यापूर्वी सीटू कामगार संघटनेने अनेक मोर्चे आंदोलने केल्याचे व प्रश्न अद्याप न सुटल्याचे अनेक पुरावे संघटनेकडे उपलब्ध आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments