On Monday, the Kisan Jan Andolan : सोमवारी किसान जनआंदोलनाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा -NNL

नांदेड| किसान जन आंदोलन भारत चे संस्थापक सचिन कासलीवाल यांच्या पुढाकारातून सोमवार दि.२३ सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडवर शेतकरी धडक मोर्च्याचे आयोजन कॉ. डॉ. अण्णा भाऊ साठे चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दु. १२.०० वाजता करण्यात आले आहे. तरी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लाखोच्या संख्येने धडक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन किसान जन आंदोलन भारत चे संस्थापक सचिन कासलीवाल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या धडक मोर्चाव्दारे शेतकरी राजा जागा हो, संघर्षाचा धागा हो अशी लक्षवेधी घोषणा देत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात येणार असून यात पिक संरक्षण कायदा करण्यात यावा. शेतकरी व पिकाच्या संरक्षणासाठी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे, शेतकऱ्यांना शेत जमिनीच्या मुल्यांकनाच्या किमान ५०% पिक कर्ज द्या. पिक कर्ज परतफेडीचा कालावधी १० वर्ष करणे तसेच आधारभूत किंमतीवरील सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने कार्यान्वित करणे व कापूस खरेदी करीता ते १ आक्टोबर २०२४ पुर्वी सुरु करा आणि पंतप्रधान पिक विमा योजनेचा क्लेम मंजूर झाला तर क्लेम रक्कम त्याच हंगामात द्या , शेतकऱ्यांना झिरो बॅलन्स वर बचत खाते काढण्याचा शेतकऱ्यांना अधिकार द्या.

यासह शेतकऱ्यांचे बचत खाते होल्ड करु नका, ऊस लागवड व तोडणी प्रोग्राम ऑनलाइन करून उस कारखान्याची दादागिरी संपवा व फळे-भाजीपाला बाजारातील एकसारख्या गुणवत्तेच्या मालाचा भाव फरक, वजन वजावट, कमीशन इ. रद्द करा आणि शेतमाल विक्री नंतर पैसे (पट्टी) त्याच दिवशी द्या.व पेस्टीसाइड व केमिकल मधील ५००% पर्यंतची नफाखोरी संपवा अशा अनेक शेतकरी हिताच्या मागण्यासह हा मोर्चा लाखोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. तरी या मोर्चात शेतकऱ्यांनी लाखोच्या संख्येने सहभाग नोंदवून आपला आक्रोश व्यक्त करावा असे आवाहन आयोजक किसान जन आंदोलन चे संस्थापक सचिन कासलीवाल यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button