नवीन नांदेड l नांदेड मनपाच्या सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक १९ मधील नुर मस्जीद भागात गेल्या २५ वर्षापासून सातत्याने करण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचा मागणी कडे होत असलेले दुर्लक्ष पाहून नांदेड अल्पसंख्याक दक्षिण तालुका अध्यक्ष शेख अस्लम व समाज बांधवांनी,नागरीकांनी आ. मोहनराव हंबर्डे यांच्या कडे केलेली मागणी दखल घेत तात्काळ दलित वस्ती निधी अंतर्गत ५ लक्ष रुपये उपलब्ध करून १६ सप्टेंबर रोजी आ.हंबर्डे यांनी या कामाचा ऊध्दघाटन सोहळा केला.


सिडको परिसरातील नुर मस्जीद परिसरातील भागात गेल्या २५ वर्षापासून पावसाळ्यात होत असलेल्या चिखल साम्राज्य व वाहन धारकांची होणारी गैरसोय व नमाज अदा करण्यासाठी समाज बांधवांची होणारी अडचण लक्षात घेता नांदेड दक्षिण अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शेख अस्लम व परिसरातील नागरीकांनी समाज बांधव यांनी आ.मोहनराव हंबर्डे यांच्या कडे सिमेंट काँक्रीट रस्ता करून देण्याची मागणी केली होती.


मागणीची दखल घेऊन दलित वस्ती निधी अंतर्गत ५ लक्ष रूपये मंजूर झाल्यानंतर १६ सप्टेंबर रोजी नुर मस्जीद परिसरातील भागात आ.मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते नारळ फोडून ऊध्दघाटन करण्यात आले यावेळी शेख मोयोध्दीन,शेख हुसेन, नुर मामु,शेख लतीफ,महेश शिंदे,हाफीज ईलायास साब,शेख फहींमोध्दीन,शिराज खान,राजु तारू,सदई खान,एकबाल साब,शेख सिकंदर,यांच्या सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.




