करियरनांदेड

JEE, NEET, MHT-CET coaching : जेईई, नीट, एमएचटी-सीईटीच्या प्रशिक्षणासाठी पात्र विद्यार्थ्यांना टँब व सिमकार्डचे वाटप – NNL

नांदेड| महात्मा ज्योतीबा फुले संशाधन व प्रशिक्षण संस्था, (महाज्योती ) नागपुर यांच्याकडून प्राप्त झालेले 154 टॅबचे वितरण जेईई/नीट/एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना जिल्हाधिकारी अभिजित राऊत व सहाय्यक संचालक शिवानंद मिनगीरे यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी या टॅबचा उपयोग चांगल्या प्रकारे करावा. तसेच जेईई/नीट/एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी टॅब मार्फत प्रशिक्षण घ्यावे. यासाठी महाज्योती मार्फत सिमकार्डही उपलब्ध करुन दिले आहेत असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सांगितले.

इयत्ता 11 वी मध्ये जेईई/नीट/एमएचटी-सीईटीची तयारी करणारे विद्यार्थ्यानी ऑनलाईन महाज्योती यावेबसाईटवर अर्ज नोंदणी करावा. त्यामध्ये इयत्ता १० वीचे गुणपत्रक व इ. आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत, ज्यास्तीत जास्त विद्यार्थी टॅबसाठी पात्र ठरतील असे आवाहन त्यांनी केले.

इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी जेईई/नीट/एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यानी टॅबचा सदुपयोग चांगल्या प्रकारे घेऊन त्याद्वारे घेण्यात येणारे प्रशिक्षणाचा फायदा घेऊन वैद्यकीय/अभियांत्रिकी प्रवेशासाठी समाज घटकातील विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरतील अशी सदिच्छा व्यक्त केली.

विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागसप्रवर्ग याघटकातील विद्यार्थ्याना स्पर्धेच्या युगामध्ये टिकूण राहणे, इतर प्रवर्गातील विद्यार्थ्याशी स्पर्धा करणे तसेच आवश्यक ते कौशल्य व गुणवत्ताधारण करणे, विद्यार्थी / विद्यार्थीनिना आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्टया विविध क्षेत्रात स्पर्धेला तोंड देता यावे आणि शैक्षणिकद्ष्टया उन्नती होणे आवश्यक असल्याचे मत सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी व्यक्त केले. टॅब वितरण प्रसंगी, विद्यार्थी, पालक कार्यालयातील कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button