
किनवट, परमेश्वर पेशवे| आजकाल गुरुचा व्यवसाय करणारे ब्रॅन्ड गुरुचा सर्वत्र सुकाळ झाला असला तरी खरा गुरु ओळखणे फार कठिण आहे. ” गुरु नव्हे हाडामासाचा, गुरु नव्हे कोण्या पंथ, धर्मांचा शुध्द् ज्ञान तत्वची अनुभवियांचा सार तुकडया म्हणे गुरु माझा”जगामध्ये व्यास मुनी, गौतम बुद्ध, संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गुरु म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा ह्यालाच गुरु म्हणतात. असे उनकेश्वर येथील अ. ज्ञा. यो. सा. म. सेवाश्रम येथे गुरु ( व्यास ) पोर्णिमा निमित्त सत्संगात ह.भ.प. नंदकिशोर गिरी महाराज यांनी विचार मांडले.


यावर पुढे बोलतांना गिरी म्हणाले की,गुरु पोर्णिमा हा उत्सव आपल्या हिन्दू धर्मातील हा प्राचीन काळापासून चालत आहे. यास व्यास पोर्णिमा म्हणतात. आपल्या समाजाचे समाज रक्षक व्यास हे महाभारत असा अमर महान ग्रंथ लिहला त्यांनी हा ग्रंथ लिहण्यासाठी आपले जीवन संपविले तो अमुल्य विचाराचे आपल्याला आजही गुरुचे इहलोकी परलोकी अभिवेद, आर्थिक प्रगतीचे ज्ञान या संस्कृतीला पुढे न्यायचे आहे.

सद्गुरु या मुळ स्वरूपाचा लोकांना विसर पडला, भारत हा देश पुर्वी ऋषी प्रधान होता आता शेती प्रधान देश आहे. जगाच्या पाठीवर इतर देश उद्योग प्रधान आहे. नैतिक ब्रम्हचर्य आजची मोबाईल वाली चंगळवाद पिढी पाळ्त नसल्याने अनमोल अशी शक्ती नस्ट होत चालली आहे..


” गुरु तु ना मिला, सारी दुनिया मिले भी तो क्या है । मेरा मन ये खिला सारी बगीया खिले तो गुरु तू ना मिला ॥ गुरु किरपा नही पड़ी सडकपर मेरा मै जानू । बीज न बोये जाते खडकपर मेरा मै जानू ॥ गुरु हात जोड और प्र पड़नेसे मिले वो सस्ता काम नही । उसको चाहीये आज्ञा पालन उसके विन आराम नही ॥ गुरु नोहे है लाख साल उमर मेरी असे राष्ट्रसंत यांनी जगाला तत्वज्ञान सांगीतले. विचार गुरु, क्रोध गुरु, चंद्रगुरु, ज्ञानी गुरु या जगातील सर्व संतानी गुरु विचार सांगीतले.

त्या गुरु तत्वाला पुर्णत्वास नेने म्हणजे गुरु ( व्यास ) पोर्णिमा होय. ” मनाला स्थिर करावया, धरी गुरु – प्रेम हृदयी या । तयाविन अन्य ना कोणी, मनाला बोधवी सखया॥’ गुरुमध्ये धेय्या पर्यंत पोहचण्यासाठी क्षमता असावी. नुसता गुरु अधिकारी असुन चालत नाही. गुरु म्हणजे अंधाराची काजळी पुसून टाकणारा दैवी प्रकाश आहे. गुरु सदाचारी,नम्र, प्रेमळ, सहानभुती पुर्वक असावा. गुरुने आपल्या आचरणातून । शिष्यासा शिष्यासाठी एक आदर्श निर्माण केला पाहीजे. असे शेवटी म्हणाले, यावेळी सामुदायीक प्रार्थना, भजन घेण्यात आली.
या कार्यकमाला सेवाश्रमाचे अध्यक्ष बाबाराव केशवे, उपाध्यक्ष किसन पवार, शिवराम पाटील मालेवार, नंदकिशोर गिरी, शामराव वल्लेपवाड, संटी काळे, आनंदराव निलगीरवार, सचिव पुंडलिक पहुरकर, सरपंच पुंडलिक गेडाम, भारत मरस्कोल्हे,सुदर्शन गेडाम, मल्लना, संतोष बोथ, संभा शेर्लावार,, विनोद डवले, कोटरंगे, भगवान पाटील, लक्ष्मण धुर्वे,मोती रबडे, मारोती शेडमाके या सह अनेक साधक उपस्थित होते. राष्ट्रवंदना,भारत माता की जय, आज के आनंद की जय, सभी साधु संतन की जय या त्रिवार जयघोषाने सांगता झाली.



