Giri Maharaj : शुद्ध ज्ञान तत्वचीअनुभवियांचा सार गुरु माझा – गिरी महाराज
किनवट, परमेश्वर पेशवे| आजकाल गुरुचा व्यवसाय करणारे ब्रॅन्ड गुरुचा सर्वत्र सुकाळ झाला असला तरी खरा गुरु ओळखणे फार कठिण आहे. " गुरु नव्हे हाडामासाचा, गुरु नव्हे कोण्या पंथ, धर्मांचा शुध्द् ज्ञान तत्वची अनुभवियांचा सार तुकडया म्हणे गुरु माझा"जगामध्ये व्यास मुनी, गौतम बुद्ध, संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गुरु म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा ह्यालाच गुरु म्हणतात. असे उनकेश्वर येथील अ. ज्ञा. यो. सा. म. सेवाश्रम येथे गुरु ( व्यास ) पोर्णिमा निमित्त सत्संगात ह.भ.प. नंदकिशोर गिरी महाराज यांनी विचार मांडले.
यावर पुढे बोलतांना गिरी म्हणाले की,गुरु पोर्णिमा हा उत्सव आपल्या हिन्दू धर्मातील हा प्राचीन काळापासून चालत आहे. यास व्यास पोर्णिमा म्हणतात. आपल्या समाजाचे समाज रक्षक व्यास हे महाभारत असा अमर महान ग्रंथ लिहला त्यांनी हा ग्रंथ लिहण्यासाठी आपले जीवन संपविले ...
