By opening 14 gates : दिग्रस बंधाऱ्याचे 14 गेट उघडून तर विष्णुपुरी चे 14 गेट उघडून गोदावरी नदी पात्रात विसर्ग -NNL

नांदेड| जिल्ह्यात दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच परभणी हिंगोली या जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत असल्याने नांदेड जिल्ह्यातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने जन जीवन विस्कळीत झाले आहे.

वरच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्याची 14 पैकी 14 गेट संपूर्ण गेट उघडून पाण्याचा विसर्ग चार लाख 31 हजार क्युसेस गोदावरी पात्रात केला जात आहे. त्यामुळे अंतेश्वर बंधाऱ्याचे यापूर्वीच गेट उघडण्यात आले आहे. त्यामुळे या भागात व गोदावरी काठी मोठ्या प्रमाणात शेतात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोदावरी दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांनी आपली जनावरे नदीपासून दूर अंतरावर नेऊन व्यवस्थित ठिकाणी हलविले असून, जायकवाडी प्रकल्पात 90% च्या वर पाणी पातळी झाली.

कोणत्याही क्षणी जायकवाडीचे सुद्धा पाणी येऊ शकते त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे प्रशासनाने आव्हान केले आहे. सध्या पाणी पातळी धोक्याच्या बाहेर असून विष्णुपुरी प्रकल्पाचे 14 गेट उघडून पाणी पातळी व्यवस्थित रित्या प्रशासन पार पाडत असल्याने शेतकऱ्यांनी आपली पिके पाण्याखाली गेल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचे गेट उघडल्याने पाणी नियंत्रणात आहे. सध्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन-तीन तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे गेट उघडण्यात येतील अशी माहिती देण्यात येत आहे.

सध्याचा विष्णुपुरीचा पाण्याचा विसर्ग 23 87 93 क्युमेक्स गोदावरी नदीपत्रात चालू असल्याने पुढील मुदखेड तालुक्यातील देवापुर व बळेगाव बंधाऱ्याची गेट उघडण्यात आले असून, पाण्याचा विसर्ग नदीपत्रात करण्यात येत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button