नांदेडस्पोर्ट्स

Summer training camp : 15 ते 30 मे कालावधीत विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर

नांदेड| क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड व नांदेड जिल्हा एकविध खेळ संघटना यांचे संयुक्त विद्यमाने विविध खेळांचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 15 ते 30 मे 2025 या कालावधीत सकाळी 6 ते सायं.8 व सायं 5.30 ते 7.30 या वेळेत जिल्ह्यातील विविध स्थळी आयोजित करण्यात येणार आहे.

तरी एकविध खेळ संघटनेचे पदाधिकारी, क्लब, अकादमी व क्रीडा प्रशिक्षक, मार्गदर्शक यांनी ज्या खेळांचे प्रशिक्षण शिबिर आपण घेणार आहात त्या खेळांचे नाव व प्रशिक्षण स्थळ तसेच प्रशिक्षणाची वेळ सकाळ व संध्याकाळ नमुद करुन तसे लेखी पत्राद्वारे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे कळवावे.

या प्रशिक्षण शिबिरादरम्यान जे प्रशिक्षणार्थी सहभागी होऊ इच्छितात त्यांनी आपले नाव व खेळ बाब नमूद करावी व तसा फॉरमॅट फॉर्म जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध राहील. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील एकविध खेळ संघटना, क्लब व अकादमी यांच्यामार्फत वरील कालावधीत संपन्न होणाऱ्या उन्हाळी मोफत क्रीडा प्रशिक्षण शिबिरास सहभागी होण्याऱ्या सर्व प्रशिक्षणार्थीना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेडच्यावतीने वरील कालावधीचे सहभागी प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येतील.

तरी नांदेड जिल्ह्यातील एकविध खेळ संघटना, क्लब व अकादमी यांनी त्यांच्या स्तरावरुन उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या संदर्भाने अवगत करुन जास्तीत जास्त नांदेड जिल्ह्यातील खेळाडुंना सहभागी करुन उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर यशस्वी संपन्न करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन
नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी मे महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 13 मे 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button