उस्माननगर l कौठा फाटा रोडवरून धनज कडे एक टिपर विनापरवाना अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या चालकाविरुद्ध उस्माननगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


उस्माननगर पोलिस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड यांनी “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना पोलीस स्टेशन हदीत अवैध रेतीची चोरटी वाहतुक व विक्री करणारे चालक व मालक या लोकांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.


त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन उस्माननगर सपोनि / संजय निलपत्रेवार हे नुमद पोलीस अंमलदार यांचेसह हदीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की, मौजे कौठा फाटा रोडने धनजकडे एक टिप्पर विनापरवाना अवैधरित्या रेती वाहतुक करीत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावरुन नमुद अधिकारी व अंमलदार मौजे कौठाफाट्या जवळ धनज रोडवर गेले असता तेथे एक टाटा कंपणीचा लाल रंगाचा टिप्पर क्रमांक MH 26 AD 8411 हा मिळुन आला.


सदर वाहन चालकास विचारता वाहनात रेती असल्याचे सांगीतले त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याने नमुद टिप्पर व 3 ब्रास रेती असा एकुण 15,15,000/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो पंचा समक्ष जप्त करून पोलीस स्टेशन उस्माननगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्माननगर पोलीस पथकाने अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करुन उत्कृष्ट कामगीरी केल्याने मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी उस्माननगर पोलीस पथकाचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.



