हिमायतनगर| शहरातील बोरगडी रस्त्यावर असलेल्या टाटा पॉवर हाऊस मधून शेकडो मिटर काॅपर युक्त केबल वायर चोरट्यांनी चोरून नेला आहे. हि घटना दि. २३ सकाळी उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसापासून हिमायतनगर शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे.


गेल्या काही दिवसापासून हिमायतनगर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. परवाच जनता काॅलनीत एका किराणा दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी किराणामाल व नगदी रक्कम चोरून नेली. हि घटना अगदी ताजी असतानाच चोरट्यांनी बोरगडी रस्त्यावर असलेल्या टाटा पॉवर हाऊस मधील ३ हजार सातशे मिटर काॅपर युक्त केबल वायर जुनी वापरातील केबल वायर अंदाजे किंमत ३५ हजार रूपयांचे वायर चोरून नेली आहे. फिर्यादी ज्ञानेश्वर आडेलू पालीकोंडावार वय ४४ वर्ष धंदा सुपरवायझर टाटा पॉवर हाऊस बोरगडी रोड हिमायतनगर यांचे फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


सातत्यानं होत असलेल्या चोरीच्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून, चोरट्याचा तात्काळ शोध घेवून अटक करावी. अशी मागणी शहरवाशीय नागरिकांतून होत आहे. दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कोमल कांगणे ह्या करीत आहेत.




