नांदेड| माळेगाव यात्रेत वीर नागोजी मैदानात दिनांक 5 जानेवारी रोजी झालेल्या कुस्तीच्या दंगलीत लोहा तालुक्यातील किवळा येथील अच्युत दिगंबर टरके यांनी बाजी मारत माळेगाव केसरीचा किताब जिंकला. त्यांना रोख 41 हजार रुपये, मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत माजलगाव जिल्हा बीड येथील लक्ष्मण अश्रुबा क-हे उपविजेता ठरले. त्यांना 7 हजार रुपये, हार, शाल,व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक परभणी येथील खाजा शेख व कंधार तालुक्यातील बामणी येथील परमेश्वर जगताप यांना विभागून देण्यात आले. प्रत्येकी 15 हजार 500 रुपये देवून गौरवण्यात आले. दीप रोहिदास कागणे, माळाकोळी, लोहा व दिलीप सांगळे, बामणी, कंधार यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन खा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, श्याम दरक, एकनाथ मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बेळगे, माजी शिक्षण सभापती संजय क-हाळे,
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय भोसीकर, हनुमंत धुळगंडे, गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो, समाज कल्याण अधिकारी आऊलवार, गणेशराव साळवे, डॉ. प्रमोद चिखलीकर, श्रीधर चव्हाण, बंटी पाटील उमरेकर, रोहित पाटील, अनिल बोरगावकर, नरेंद्र गायकवाड, माधव चांदने, केरबा पाटील मन्नान चौधरी, श्रीनिवास मोरे, ग्रामविकास अधिकारी देवकांबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी कुस्तीचे विविध डावपेच पाहण्याचा आनंद प्रेक्षकांनी घेतला. लोहा पंचायत समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते.