Thursday, May 14

Tag: A brilliant performance in a wrestling riot

Achyut Turke : अच्‍युत टरके ठरला माळेगाव केशरी; कुस्‍ती दंगलीत चमकदार कामगिरी -NNL

Achyut Turke : अच्‍युत टरके ठरला माळेगाव केशरी; कुस्‍ती दंगलीत चमकदार कामगिरी -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| माळेगाव यात्रेत वीर नागोजी मैदानात दिनांक 5 जानेवारी रोजी झालेल्या कुस्तीच्या दंगलीत लोहा तालुक्यातील किवळा येथील अच्युत दिगंबर टरके यांनी बाजी मारत माळेगाव केसरीचा किताब जिंकला. त्यांना रोख 41 हजार रुपये, मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, व सन्मानपत्र देऊन गौरव करण्‍यात आला. या स्पर्धेत माजलगाव जिल्‍हा बीड येथील लक्ष्मण अश्रुबा क-हे उपविजेता ठरले. त्यांना 7 हजार रुपये, हार, शाल,व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक परभणी येथील खाजा शेख व कंधार तालुक्यातील बामणी येथील परमेश्वर जगताप यांना विभागून देण्‍यात आले. प्रत्येकी 15 हजार 500 रुपये देवून गौरवण्यात आले. दीप रोहिदास कागणे, माळाकोळी, लोहा व दिलीप सांगळे, बामणी, कंधार यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन खा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, आ. प्रतापराव पाटील...
error: Content is protected !!