नवीन नांदेड। भावसार समाज सिडको नविन नांदेड च्या वतीने दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल मंदिर ,हडको नवीन नांदेड येथे महाआरतीचे आयोजन केले होते. मोठ्या उत्साहवर्धक, वातावरणात ,भक्तीभाव पूर्ण आनंदात साजरा करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्ताने महाआरती आयोजन करण्यात आले. याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी पुष्पहार, पूजन करून महाआरती करण्यात आली. यावेळी विनोद सुत्रावे , अध्यक्ष भावसार समाज सिडको ,शिवराज पेंडकर,संचालक एस.टी. महामंडळ सहकारी बँक नांदेड राजू आंबेकर, समन्वयक जीवनसाथी उप वधूवर सूचक मंडळ सिडको, राजू सितावार, ओमप्रकाश पेंडकर,विश्वानंद परळकर, समन्वयक शैक्षणिक मार्गदर्शन सिडको,संजय पेटकर, अध्यक्ष सौ.छाया शिवराज पेंडकर , सौ.शीतल राजू अंबेकर, सौ.शारदा विनोद सुत्रावे, विद्या संजय पेटकर यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते.