Thursday, May 14

Laxman Dange : हिमायतनगर नगर पंचायत अंतर्गत नाल्याची सफाई करून पथदिवे तात्काळ बसवा – लक्ष्मण डांगे

हिमायतनगर,अनिल मादसवार | नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रं. 11 मधील नाल्यामध्ये केरकचरा अडकुन पुर्णतः नाल्या बुजुन गेल्या आहेत. यामुळे घरातील सांडपाणी वाहण्याचा मार्ग बंद झाले आहे. परिणामी नालीतील घाण पाणी थेट रस्त्यावर येत असून, परिसरात पाणी तंबुन दुर्गंधी सुटली आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. एव्हढेच नाहीतर वॉर्डात मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद पडल्याने रात्रीला अंधार पडला आहे. यामुळे चोरीच्या घटना होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तात्काळ या समस्या सोडवाव्यात अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण डांगे यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर नगरपंचायत च्या निवडणूक झाल्या नसल्याने शहराचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यामार्फत चालविला जात आहे. असे असताना नगर पंचायत चे अधिकारी कर्मचारी शहातील नागरी समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. यामुळे नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रं. 11 मधील जणतेच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे स्वच्छतेचा असून, नाल्यामध्ये केरकचरा अडकुन पुर्णतः नाल्या बुजुन गेल्या आहेत. यामुळे घरातील सांडपाणी वाहण्याचा मार्ग बंद झाले आहे. परिणामी नालीतील घाण पाणी थेट रस्त्यावर येत असून, घाण पाणी तंबुन दुर्गंधी सुटली असल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

कारण सदर घाणीमुळे डासांची उत्पत्ती वाढली असून, या डांसामुळे साथीच्या रोगाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. तसेच वॉर्डातील केर कचरा नेण्यास कचरा गाडी येत नसल्यामुळे रस्त्याने सर्वत्र कचरा झाला आहे. हाच कचरा नालीमध्ये पडत असल्याने नाल्या बुजुन जात आहेत. तसेच वार्ड क्रं. 11 मध्ये असलेल्या मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद पडली असुन, याची दुरुस्ती झाली नसल्याने सर्वत्र अंधार झाला आहे. यामुळे रात्रीला जनतेला ये जा करतांनी तारेवरची कसरत करत जावे लागत असून, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीला काळोख निर्माण होत असल्याने चोरी होण्याची शक्यता नाकारत येत नाही आहे.

IMG 20250317 WA0026 Laxman Dange : हिमायतनगर नगर पंचायत अंतर्गत नाल्याची सफाई करून पथदिवे तात्काळ बसवा - लक्ष्मण डांगे

या सर्व बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वॉर्ड क्रमांक ११ मधील समस्या प्रत्यक्ष भेट देऊन लक्षात घ्यायचा आणि तात्काळ या प्रभागत घंटा गाडी पाठवुन नियमित कचरा नेणे आणि नाल्या साफ करुन वार्डातील पथदिवे सुरु करण्यासाठी बल्प बसवुन देण्याची संबंधी कर्मचाऱ्यांना आदेशीत करावी. अन्यथा हिमायतनगर भाजपा तर्फे लोकशाही मार्गाचा अवलंब करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असा इशारा भाजपचे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणभाऊ मारोती डांगे यांनी एका निवेदनाद्वारे प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार पल्लवी टेमकर, कार्यालयीन अधिक्षक महाजन यांच्याकडे दिला आहे. निवेदन देताना भाजप तालुकाध्यक्ष गजानन चायल, वैभव दंडेवाड, दुर्गेश मंडोजवार, आदींसह अनेकांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!