HomeनांदेडBahadar Art Festival : आजपासून कुसुम नाट्यगृहात पारंपरिक लोककलेचा बहारदार कला महोत्सव

Bahadar Art Festival : आजपासून कुसुम नाट्यगृहात पारंपरिक लोककलेचा बहारदार कला महोत्सव

नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आयोजित असंघटित लोककलांचा महोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नांदेडमध्ये करण्यात आले आहे.

श्रीकृष्ण कला फाऊंडेशन यांच्या समन्वयातून ता.१७ ते १९ मार्च दरम्यान कुसुम नाट्यगृह, व्ही.आय.पी. रोड, नांदेड येथे हे कार्यक्रम होतील. दररोज सायंकाळी सहा ते दहा या वेळेत होणाऱ्या या महोत्सवाचा प्रवेश विनामूल्य असेल. या कला महोत्सवात G20 परिषदेत सादर झालेल्या महाराष्ट्रातील विविध पारंपरिक व लोककलांचे सादरीकरण होणार असून, पहिल्या दिवशी सोमवारी (ता. १७) पिंगळा, बहुरूपी, धनगरी ओवी, हेळवी, करपल्लवी, गोंधळी आणि कडकलक्ष्मी यांचे सादरीकरण होईल.

दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.१८) गोंधळी आदिवासी गोंडी नृत्य – दंडार (घुसाडी), आदिवासी पाटा गायन, पिरो-धिरो नृत्य, मथुरा लभाण नृत्य आणि पोतराज यांचा समावेश आहे. तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.१९) वासुदेव, लैंगी, बंजारा होळी नृत्य, दिमडी वादन, संबळ वादन आणि भारूड यांचे सादरीकरण होणार आहे.

हा महोत्सव असंघटित कलाकारांच्या लोककला सादरीकरणासह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अनुभव देणारा ठरणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे (भा.प्र.से.) आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकारला जात आहे. नागरिकांना या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन शासनातर्फ केले आहे. प्रवेश सर्वांसाठी मोफत असून, नांदेडमधील नागरिकांना महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा आनंद घेण्याची ही सुवर्णसंधी आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments