देगलुर l देगलूर तालुक्यातील मंडगी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन अनेक दिवसांपासून सुरू होते. अखेर गावातील श्री छत्रपती गणेश मंडळाच्या तरुणांनी पुढाकार घेत शाळेसाठी मदतीचा हात पुढे केला.


मुख्याध्यापक श्री. डाकोरे व शिक्षक श्री. साखरे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत मंडळाने त्यांच्या जमा निधीतून ५ हजार रुपयांचा निधी शाळेला दिला. या रकमेतून शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, शाळेला सुरक्षेची नवी सुविधा उपलब्ध झाली आहे.


गावातील तरुण मंडळींनी सामाजिक बांधिलकी जपत केलेला हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शाळेला नेहमीच मदत करणाऱ्या गावकऱ्यांसह श्री छत्रपती गणेश मंडळाचे शिक्षक व पालकांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.




