हिमायतनगर, अनिल मादसवार| वर्षानुवर्षे तुटक पाणीपुरवठा, खड्डेमय रस्ते, कचऱ्याचे साम्राज्य, तुंबलेल्या नाल्या आणि रखडलेल्या मूलभूत सुविधा… अशा परिस्थितीत जगण्याची सवय झालेल्या हिमायतनगरच्या नागरिकांनी या वेळी बदलाची हाक दिली आहे. सामान्य नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष, निधीचा अपुरा वापर आणि विकासाच्या नावाखालीली स्थिरावलेली प्रगती… या सर्व पार्श्वभूमीवर शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.


याच बदलाच्या अपेक्षेने, “ट्रिपल इंजिन सरकार” या संकल्पनेवर आधारित प्रचाराला मोठी गती मिळत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री, राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेंद्र वानखेडे यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.


उच्चशिक्षित, प्रामाणिक प्रतिमा असलेले आणि गेली तीन दशके वैद्यकीय सेवेतून जनतेची अविरत सेवा करणारे डॉ. वानखेडे हे या निवडणुकीत शहर विकासाचा नवा मार्ग दाखवतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे. जनतेने डॉ. वानखेडे याना निवडून दिल्यानंतर शहरात बारमाही व घरपोच पाणीपुरवठा, अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम, तुंबलेल्या नाल्यांपासून मुक्तता, नागरिकांसाठी विशेष खिडकी योजना, आधुनिक उद्यान व प्ले पार्क, सर्व रस्त्यांचे दर्जेदार पुनर्निर्माण, आठवडी बाजाराची स्वतंत्र व्यवस्था, कोंडीपासून मुक्तता, शेतकऱ्यांसाठी भाजीपाला विक्रीची विशेष जागा.



कचरा व्यवस्थापनाची सक्षम व वैज्ञानिक पद्धत, सार्वजनिक वाचनालयाचे पुनरुज्जीवन, व्यापाऱ्यांच्या समस्यांसाठी ईझ ऑफ बिझनेस मॉडेल, तक्रार निवारणासाठी विशेष यंत्रणा, चौकांचे भव्य सुशोभीकरण,
या निवडणुकीत जाती-धर्माचा मुद्दा नाही, तर हिमायतनगरच्या विकासाचा प्रश्न महत्वाचा आहे, असा संदेश भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे. “जनतेचा आशीर्वाद हीच आमची ताकद” या घोषवाक्यासह शहरभर उत्सुकता वाढली आहे. येत्या २ तारखेला कमळ चिन्हावर मतदान करून हिमायतनगरच्या विकासदिशेचा निर्णय घ्या, असे आवाहन भाजपच्यावतीने करण्यात आले आहे.



