श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। मौजे लांजी ता. माहूर येथील गणेश शेषेराव दामलवार व इतर ३ यांनी दिनांक २८.११.२०२३ रोजी तहसिलदार कार्यालयात रस्ता खुला करुण देणेबाबत विनंती अर्ज केला होता. तरी त्याबाबत मा. तहसिलदार साहेब माहूर यांनी मंडळ अधिकारी, माहूर यांना चौकशी करीता दिनांक २९.१२.२०२३ रोजी पत्र काढले.
या प्रकरणात आपण जायमोक्यावर जाऊन विषयाकीन रस्ता खुला करून देण्याची नियमानुसार कार्यवाही करावी व या कार्यालयास अनुपालन अहवाल सादर करावा तसेच संबंधितना अवगत करावे प्रकरणात विलंब करू नये या बाबत दक्षता घ्यावी. पत्र काढून सहा महीने उलटूनही मंडळ अधिकारी व्हि.के.पाईकराव जायमोक्यावर न गेल्याने उलट सुलट चर्चा होत आहे.
मौजे लांजी येथील शे.स.न.१९ मध्ये ये-जा करण्यास असलेली भावकी हिस्यातील परंपरागत वहिवाट असलेला व ७/१२ इतर अधिकार रकान्यात नोंद असलेला बैलगाडी रस्ता आडवत असल्याने रस्ता खुला करुण मिळणे बाबत गणेश शेषेराव दामलवार रा.लांजी ता.माहूर व इतर भाऊ, आई, पत्नी अर्जदार असून आम्ही दिनांक २८.११ रोजी मा.तहसिलदार साहेब, माहूर यांचेकडे विनंती अर्ज केला होता.
तरी त्याबाबत मा. तहसिलदार साहेब, माहूर यांनी मंडळ अधिकारी, माहूर यांना चौकशी करीता दिनांक २९.१२ रोजी पत्र सुध्दा काढण्यात आले आहे. त्यांबाबत मंडळ अधिकारी. व्हि.के. पाईकराव यांना रस्ता चौकशी करीता साहेब कधी येता असे विचारणा केली असता पाईकराव साहेब हे आज येतो उद्या येतो असे सांगत आज रोजी ६ महिणे लोटल्यागेले. तसेच मी तिथे येवून काय करु? माझ्या कोन ओळखीचे आहे असे म्हणतात.
तसेच मा.मंडळ अधिकारी साहेबांना रस्ता चौकशी करीता काहि पैशांची आशा असल्याचेही त्यांचे बोलाण्यावरुण समजून येते तसेच मंडळ अधिकारी साहेबांना वारंवार विनंती करुण सुध्दा अद्यापर्यंत मा. मंडळ अधिकारी पाईकराव साहेब हे रस्ता चौकशी करीता आलेले नाहित. अशा अशयाचे अर्ज पुन्हा दि,१८.६.२०२४ रोजी गणेश शेषेराव दामलवार.सुमनबाई शेषेराव दामलवार.संगिता गणेश दामलवार.रणजित शेषराव दामलवार यांनी तहसिल कार्यालयात सादर केला आहे.