नांदेड| फेस्काॅमच्या ध्येय धोरणानुसार तथा फेस्काॅमचे अध्यक्ष मा.अरूण रोडे यांच्या आदेशानूसार “ज्येष्ठ नागरिक प्रबोधन तथा गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ स्थापणा” या चळवळी अंतर्गत आज स्व.स्वा.से. डाॅ.दादारावजी वैद्य (आर्य) सभागृह, वैद्यरूग्णालय परिसरात आयोजित महासभेत नांदेड भूषण ज्येष्ठ नागरिक नेते डाॅ.हंसराज वैद्य यांनी ज्येष्ठांनां मार्गदर्षण केले.
सभागृह ज्येष्ठ नागरिक प्रमुखानी व ज्येष्ठ नागरिकांनी खचा खच भरलेले होते.मंचावर वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघाध्यक्ष गिरिष बार्हाळे,नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती सचिव प्रभाकर कुंटूरकर उपस्थित होते.डाॅ.हंसराज वैद्य मार्गदर्शन करतांना म्हणाले,माय बाप ज्येष्ठांनो, आपण प्रत्येक कुटूंबागणिक एक ते चार(आई-बाबा,आजोबा आजी)ज्येष्ठ नागरिक आहोत! एकून जनसंख्येच्या आठरा टक्यापेक्षाही जास्त (नोंदणींकृत-अनैंदणींकृत तथा शहरी व ग्रामिन मिळून) संख्येने आपण ज्येष्ठ नागरिक
आपण कुठल्यातरी एकाच चिन्हावर आज पर्यंत मतदान करत आलो.आज पर्यंत आपण निरपेक्ष मतदान करत आलो. आपण अनेक सरकारे निवडून दिली.अनेक सरकारे आपणच बनविली.अर्थात आपल्याच मतावर, कुण्यातरी एकाच चिन्हावर शंभर टक्के मतदान करत आल्यामुळेच वेग वेगळ्या पक्षाची सरकारे आज पर्यंत बणत आली व बणतील . बणविणारे आपणच आहोत! घटणाकार, विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हाती एकच नव्हे,तर पती-पत्नी, मुलगा-सुन,व मुलगी -जावाई अशा “सहा मतांचे आस्र” दिलेली आहेत.या आस्रा बरोबरच त्यांनी आपणास “शिका”, “संघटीत व्हा”आणि “संघर्ष करा” ही तिन “महा मंत्रत”ही दिली आहेत.तरी पण आपण त्यांनी सांगीतल्या प्रमाणे “शहाणपण शिकलो” नाही,”संघटीत झालो” नाहित आणि आज पर्यंत हाक्का साठी तथा अधिकारा साठी आपण कधी “संघर्षही केला” नाही!
राजकारण्यांनी आज पर्यंत आपला फक्त आणि फक्त फूकटच्या मतासाठी वापर करून घेतला आहे! आपणास खोटी आश्वासने व मृगजळी,भंपक तथा भ्रामक सामान्य व सामायीक योजनांचे आमिष तथा गाजर दाखऊन वेळ हाणून नेण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे!कुठल्याही योजनांचा आज पर्यंत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना कसलाच सरळ फायदा झाला नाही.
फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणून अशी एकहि योजना सरकिरनीं आणली नाही व त्या योजनेचा कुण्याही ज्येष्ठ नागरिकाला सरळ फायदा झाला नाही.आज पर्यंत आपण आपली अमुल्य अशी मतं विना मुल्य दिली आहेत.गरिब गरजवंत आपण गरिबच राहिलो व आपल्या फूकट दिलेल्या मतांवर अनेकांना आपण “गब्बर सिंग” केले आहे! आपल्या पैकी अनेक ज्येष्ठ नागरिक अन्न-पाणी-औषधी वेळेवर न मिळाल्या मुळे तडफडून मेली.आपण आता तरी शहाणे होणार आहोत की आपणहि असेच मरणार आहोत? .संघटीत होणार आहोत की नाही? “फेस्काॅम”च्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्या साठी आपण संघर्ष करणार आहोत की नाही? असे म्हणताच सभेतून सर्वानीच दोन्ही हात वर करून प्रतिसाद दिला!
केंद्र व राज्य शासनास सावधानतेचा इशारा!
येत्या 23जून पासून केंद्र शासनाचे व 27 जून पासून सद्याच्या महाराष्ट्र शासनाच्या कार्यकाळाचे कदाचित हे शेवटचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.त्या आधिच आपण केंद्र व महाराष्ट्र शासनास सावधानतेचा या बैठकीतच इशारावजा सुचणा देऊयात.आता बस झाले! आपल्या पक्षाचे सरकार बणवायचे असल्यास तुम्ही कसल्याहि मोर्चा बंधी करा,कसल्याही महा युत्या करा,कितीही महा आघाड्या करा तुम्हाला आता आम्हा ज्येष्ठ नागरिकांनां वगळून तथा वार्यावर सोडून सरकार स्थापन करता येणार नाही! जर महाराष्ट्रात सरकार स्थापन करावयाचे असेल तर प्रथम या अधिवेशनातच ज्येष्ठांचे प्रलंबित प्रश्न सहानुभूतीने सोडवा.ज्येष्ठ नागरिक धोरण तंतोतंत अंमलात आणा.सर्व शासकीय योजनांसाठी ज्येष्ठांचे वय वर्ष साठच ग्राहय धरा.मूल भूत सुख सोई द्या.ज्येष्ठ नागरिकांचा छळ थांबवा.प्रतारणा थांबवा.ज्येष्ठांनां आता “गृहित” धरू नका.ज्येष्ठांचा 2007चा कायदा, 2010चे पारित नियम,आणि 2013 चा कायदा तंतोतंत अंमलात आणा.ज्येष्ठांचा सन्मान राखा.
शेजारिल इतर राज्यां प्रमाने महाराष्ट्रातील सरसकट ज्येष्ठ नागरिकांनां नको, पण गरीब,गरजवंत दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित शेतकरी शेतमजूर,कष्टकरी, कामगार, विधवा माता तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांनां तरी प्रतिमहा किमान 3500/- रू मानधन विना अट सरळ त्यांच्या बँक खात्यावर जमा होतील अशी वेगळी तरतूद याच अर्थ संकल्पिय अधिवेशनातच करा.ज्येष्ठांचा आरोग्य विमा भरा.एकून जनसंख्येच्या प्रमाणाचा विचार करून त्यांच्यातूनच त्यांच्या प्रश्नांची जान तथा भान असलेला एक प्रतिनिधी विधान परिषदेवर व एक प्रतिनिधी राज्य सभेवर पाठविण्याची तरतूद करा.बस व रेल्वे प्रवास सेवा विनामुल्य व आरक्षण सोईचा करा.शासकीय सुख सुविधा व योजनांच्या लाभांसाठी सुधारित आधार कार्ड, रॅशन कार्ड,ज्येष्ठ नागरिक कार्डच ग्राहय धरा व शासना मार्फत नविन कार्ड देणें (बंद केलेले) त्वरित पुन्हा सुरू करा. बँक इंटरेस्ट व उत्पन्न मर्यादा वाढवा. ज्येष्ठांनां कसलाच टॅक्स लाऊ नका.महानगर पालिका, नगरपालिका करात ज्येष्ठांना संपूर्ण कर माफ करण्याच्या कायदा करा व तशा सुचणा द्या!
.
येत्या विधान सभा निवडणूकीत ज्येष्ठ नागरिकांची मते हवी असतील तर “निवडणूक जाहिरनाम्यात” ज्येष्ठांसाठी करण्यात येत असलेल्या सुख सोई तथा योजनांचा उल्लेख करा.मानधन द्या. आम्हाला गृहित धरू नका. आता आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी ठरविले आहे की जो कोणता पक्ष आमचे प्रश्न गांभिर्याने, सहानुभूतीने, न्यायीक भावनेने सोडविण्याची निवडणूक जाहिरनाम्यात हमी देईल व 3500 ते 5000/-प्रतिमहा मानधन देण्याचे नाण्य करेल, जाहिर करेल त्या पक्षाच्या चिन्हावरच आम्ही एकवट मतदान करण्याचे ठरविलेले आहे.असे म्हणताच सभागृहातील सर्वच ज्येष्ठ नागरिकांनी पुन्हा दोन्ही हात वर करून मान्य असल्याचे संकेत दिले.मान्य मान्य असे म्हटले!