हिमायतनगर (अनिल मादसवार) वाढोणा शहराची कुलस्वामिनी माता कालिंका देवी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा दि.22 सप्टेंबर पासून नवरात्रोत्सवाची धूम सुरु होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमात तमाम महिला, पुरुष भाविक भक्तांनी सहभागी होऊन शोभा वाढवावी. असे आवाहन मंदिर कमेटीच्या वतीने नांदेड न्युज लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आले आहे.


अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १९४७ दि.२२ सोमवारी माता कालिंका देवीचा महाभिषेक व अलंकार सोहळा व घटनस्थपणा सकाळी ०९.०१ ते ११.३० वाजेच्या शुभमुहूर्तावर माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याहस्ते संपन्न होणार आहे. तसेच दररोज रात्री ७ ते ८ या वेळेत या ठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या माता दुर्गादेवीची महाआरती केली जाणार आहे. तसेच दिनांक २३ पासून सात दिवस दररोज दुपारी १ ते ४ दरम्यान संगीतमय देवी भागवत कथा प्रवचन हभप.सत्यदेवजी महाराज भांबुलकर यांच्या मधुर वाणीत होणार असून, या कार्यक्रमाचे आयोजन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे.



तसेच दररोज सकाळी ९ ते १२ या वेळेत वेद शास्त्र संपन्न पुरोहित श्री कांतागुरु वाळके यांच्या मधुर वाणीतून सप्तशती पाठाचे वाचन होणार आहे. दररोज श्री कालिंका देवी महिला – पुरुष भजनी मंडळींकडून सायंकाळी ४ ते ५ या वेळात हरिपाठ होईल. नित्यनेमाने सकाळी व सायंकाळी कालिंका देवीची महाआरती होऊन तीर्थ प्रसादाचे वितरण होणार आहे. बुधवार दिनांक ०१ ऑकटोबर रोजी नवमीला माता कालिंका देवीला प्रसन्न करण्यासाठी सकाळी ७ ते १२ वाजेच्या दरम्यान होमहवन व पूर्णाहुती कार्यक्रम संपन्न होणार आहे. दिनांक ०२ ऑकटोबर रोजी ४ वाजता विजयादशमी (दसरा) मिरवणूक ढोल तश्याच्या गजरात काढली जाईल.



या भक्तिमय वातावरणात संपन्न होणाऱ्या नवरात्रोत्सव कार्यक्रमाचा लाभ शहरासह पंचक्रोशीतील सर्व महिला – पुरुष भक्तांनी घ्यावा. असे आव्हान मंदिर कमेटीचे अध्यक्ष राजेंद्र रामदिनवार, उपाध्यक्ष दिलीप पार्डीकर, सचिव संजय मारावार, सहसचिव गजानन तीप्पणवार, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर पंदलवाड, सल्लागार शरद चायल, विश्वस्त धर्मपुरी गुंडेवार, नारायण गुंडेवार, जीवन घोगारकर, शिवाजी भंडारे, आशिष सकवान, सौ.संगीता साखरकर, सौ.सुनंदा दासेवार, सौ.मालाबाई भिसीकर, समस्त गावकरी मंडळीनी केले आहे.


