हिमायतनगर| राज्य शासनाने आमदार अमित गोरखे यांच्या लेखी पत्राव्दारे न्यायमुर्ती अनंतजी बद्दर समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ तात्काळ रद्द करावी व मातंग समाजाला अबकड आरक्षण उपवर्गीकरण विधेयक मंजुर करुन तात्काळ मिळालेच पाहिजे.यासह मातंग समाजाच्या मागण्यांसाठी शुक्रवारी लोकस्वराज्यच्या वतीने परमेश्वर मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून आंदोलन कत्यार्नी निवेदन देण्यात आले.


या जेलभरो आंदोलनाचे नेतृत्व हिमायतनगर तालुकाध्यक्ष सदानंद ऐरणकर पार्डीकर,तालुका सचिव रामदास जळपते , यांनी केले आहे.यावेळी धोंडोपंत बनसोडे मराठवाडा कार्याध्यक्ष यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले. भाजप महायुतीने माजी न्यायमुर्तीअनंतजी बद्दर अभ्यास समितीला देण्यात आलेली मुदतवाढ तात्काळ रद्द करुन,येत्या एक महिन्याच्या आतअभ्यास समितीचा अहवाल तात्काळ स्वीकारुन राज्य मंत्रिमंडळामध्ये बहुमताने विधेयक मंजुर करुन तात्काळ उपवर्गीकरण लागु करण्यात यावे.


अन्यथा येणाऱ्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून, शासनाला आंदोलनाचे कार्यकर्ते जाब विचारतील.असेही शेवटी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात भावना व्यक्त केले आहे.पोलीस स्टेशनमध्ये सर्व आंदोलकांना पोलीस व्हॅनमधुन स्टेशनला नेत,त्यांची अखेर सुटका केली.तसेच मागण्याचे निवेदन स्वीकारले आहे.


या जेलभरो आंदोलनात पुंजाराम गाडगे खडकीकर,कॉम्रेड शामराव गुंडेकर, माजी उपसरपंच परसराम भालेराव, दिगांबर तपासकर,दिगांबर गायकवाड,संभाजी दाडेराव,कौशल्या दाडेराव,अविनाश निसाळे, कलावती गोरेकर,प्रकाश भालेराव,गीता गोरेकर, लक्ष्मीबाई गोरेकर,निलाबाई गोरेकर, भैय्या गोरेकर,प्रकाश महाजन, आनंद तपासकर,नागनबाई तपासकर, अंजना मुळेकर, वंदना जळपते,पंचाबाई कराळे,ज्योती जळपते, सखुबाई जळपते,जनाबाई जळपते,पार्वती तपासकर,गयाबाई जळपते, करणा जळपते,अनिल जळपते, बबन जळपते,अमोल जळपते, नारायण जळपते, मंगेश जळपते,मारोती जळपते,रवि गोरेकर, नागोराव गोरेकर,कलावती गोरेकर, देवराव वानोळे,यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तहसील कार्यालय ते परमेश्वर मंदिरा पर्यंत पदयात्रा काढत सहाय्यक पोलीस निरीक्षक वाठोरे यांना निवेदन देण्यात आले आहे.



