HomeनांदेडIndependence Day celebrated : हिमायतनगर तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Independence Day celebrated : हिमायतनगर तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील तहसील कार्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एक दिवस आधीपासूनच देशभक्तीच्या वातावरणात सजावट व तयारी करण्यात आली होती.

IMG 20250815 085755 Independence Day celebrated : हिमायतनगर तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. सकाळी ९:०५ वाजता तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सौ. पल्लवी टेमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर पोलिस बांधवांनी तिरंग्याला मानवंदना दिली.

IMG 20250815 091126 Independence Day celebrated : हिमायतनगर तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

तहसीलदार टेमकर यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, नायब तहसीलदार पंगे, नगरपंचायतीचे महाजन, बोकारे आदी मान्यवरांसह विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IMG 20250815 092853 Independence Day celebrated : हिमायतनगर तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

IMG 20250815 093822 Independence Day celebrated : हिमायतनगर तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments