नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने “भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त” राज्यभर विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सांस्कृतिक विभागातर्फे केले जात आहे.


आणि याच भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड येथे सांस्कृतिक कार्य मंत्री सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, श्री. बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्यसंचालनालाय यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड मध्ये दि.७ व ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वा. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नांदेडमध्ये कुसुम सभागृह येथे करण्यात आले आहे.


दिनांक ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक रविराज भद्रे, आनंद कीर्तने आणि प्रीती टोम्पे यांच्या सुश्राव्य वाणीतून संविधानावर आधिरीत अनेक गाणी “गौरव गाथा संविधानाची” या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर होणार आहेत. व तसेच ८ नोव्हेंबर रोजी “राष्ट्रग्रंथ- आधारस्तंभ लोकशाहीचा” हे ४० रंगकर्मींनी समाविष्ट असलेले महानाट्य आर्टिस्टिक ह्यूमन्स, मुंबई यांच्यावतीने सादर केले जाणार आहे.


हा सांस्कृतिक महोत्सव लोककलेच्या सादरीकरणासह संविधानाच्या माध्यमातून देशालाच नाही तर सर्व जगाला मानवता, समता, बंधुत्व आणि समानता याचा संदेश देणाऱ्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना मानवंदना देणारा आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन शासनातर्फ केले आहे. प्रवेश सर्वांसाठी मोफत असून, नांदेडमधील नागरिकांना महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा आनंद घेण्याची ही सुवर्णसंधी आहे असे आव्हान सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री.विभीषण चवरे यांनी केले आहे.




