HomeकृषीOnline registration : हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

Online registration : हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

नांदेड| केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत नाफेडच्यावतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम 2025-26 मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी 30 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी एकूण 13 खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात सोयाबीन खरेदी शनिवार 15 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे.

मुखेड तालुका खरेदी विक्री संघ मुखेड, हदगाव तालुका खरेदी विक्री संघ हदगाव, कुंडलवाडी विविध कार्यकारी से. सह. सो. कुंडलवाडी, नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सह.संस्था (अर्धापुर), तालुका खरेदी विक्री संघ बिलोली (कासराळी), पंडित दीनदयाल उपाध्याय अभिनव सह. संस्था देगलूर, बळीराम पाटील फळे व भाजीपाला सह.ख.वि.संस्था (बेरळी), मुखेड फळे व भाजीपाला सह.ख.वि. संस्था (उमरदरी), किनवट तालुका कृषिमाल प्रक्रिया सह. संस्था गणेशपूर (ता. किनवट), जय महाराष्ट्र शेतीमाल खरेदी विक्री सह.संस्था (कौठा), स्वामी विवेकानंद अभिनव सह. संस्था (शेळगाव थडी) ता. धर्माबाद, अष्टविनायक शेतीमाल खरेदी विक्री सह. संस्था मानवाडी फाटा (ता. हदगाव), महात्मा बसवेश्वर ग्रामीण विकास मंडळ बापशेटवाडी (मुक्रामाबाद) या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशन मार्फत मूग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे.

शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा ई- पिक पाहणी अहवाल नोंद असलेला सात/बारा उतारा, आधारकार्ड व बँक पासबूक इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन नोंदणी करावी. सदरील नोंदणी ही ऑनलाईन पध्दतीने POS मशीनद्वारे करण्यात येणार असल्याने नोंदणीसाठी प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments