Wednesday, May 13

Tag: Independence Day

Independence Day celebrated : हिमायतनगर तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Independence Day celebrated : हिमायतनगर तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील तहसील कार्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एक दिवस आधीपासूनच देशभक्तीच्या वातावरणात सजावट व तयारी करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. सकाळी ९:०५ वाजता तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सौ. पल्लवी टेमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर पोलिस बांधवांनी तिरंग्याला मानवंदना दिली. तहसीलदार टेमकर यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, नायब तहसीलदार पंगे, नगरपंचायतीचे महाजन, बोकारे आदी मान्यवरांसह विविध शासकी...
15th August Independence Day : 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस; लेखिका….वर्षा संजय जमदाडे -NNL

15th August Independence Day : 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस; लेखिका….वर्षा संजय जमदाडे -NNL

नांदेड, लेख
"जिथे भाव आहे, ताल आहे, राग आहे अशी माझी भारतमाता" आज "15 ऑगस्ट" आपल्या भारत मातेला प्रथम आपण वंदन करूयात. आपल्या जीवनामध्ये पाच माता खुप महत्त्वाच्या आहेत. 1) भारतमाता 2) भुमाता 3) गोमाता 4) गंगा माता 5) जन्म देणारी आपली आई या पाच मातांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. ते आपण कसेहि फेडू शकत नाही. या माता खुप खुप महान आहेत. यांचे वर्णन आणि स्तुती करण्यास हो आपण साधारण माणसे कमी पडतो या मातांना आपण वंदन आणि कोटी कोटी प्रणाम करूयात. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खुप आनंदाचा, हर्षाचा, उल्हासाचा मोठा सण आहे "15 ऑगस्ट" हा दिवस आपल्या राष्ट्राचा भाग्योदय आणि समाजाला अभय प्राप्त करून देणारा दिवस आहे. कितीतरी मानवपुष्प हसत हसत समर्पित झाले आपल्या या भारत भुमीला स्वतंत्र करण्यासाठी आणि म्हणूनच "15 ऑगस्ट" ची पहाट हि स्वतंत्रता दिवसाची पहाट म्हणून उदयास आली आपली भारत माता गुलामगिरीतून स्वतंत्र झाली. तो ह...
error: Content is protected !!