नांदेड| पतंजली योग परिवार नांदेड तर्फे स्वदेशी जनजागरण रॅली काढण्यात आली. मोटरसायकल रॅली सकाळी साडेआठ वाजता अशोक नगर हनुमान मंदिर ठिकाणावरून निघाली. या रैलीला अनिल शेटकार, पंढरीनाथ कंठेवाड, डॉ. रमेश नारलावार यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. ही रॅली वर्कशॉप, श्रीनगर, आयटीआय, यशवंत कॉलेज रोड, भाग्यनगर कॉर्नर मार्गे अशोक नगर येथे संपवण्यात आली.


पतंजलीच्या कार्यकर्त्यांनी स्वदेशी जनजागरण मोहिमेची माहिती पत्रक दुकानदारांना, विद्यार्थ्यांना व नागरिकांना वाटले. स्वदेशी वस्तू वापरा – देश वाचवा, विदेशी वस्तूंचा बहिष्कार असो, वंदेमातरम्, भारत माता की जय अशा घोषणा देत पतंजली कार्यकर्ते जात होते.

याप्रसंगी सर्वश्री रामजी शिवपनोर, महारुद्र माळगे, महानंदा माळगे, शिवाजीराव शिंदे हळदेकर, सदाशिवराव बुटले पाटील, हरिहर नरवाडे, अतुल शिंदे, अनिल कदम, अनिल कामिनवार, शैलेंद्र नावडे, सुरेश लंगडापुरे, देवेश सलगरकर, बालाजी वारकड, सुरेखाताई घोगरे, स्वातीताई बेंबरे, प्रीतम भराडिया, आबासाहेब कल्याणकर, सोपानराव मारकवाड, किरण मुत्तेपवार, दिलीप आघाव, रमेश बंडेवार, हनुमंत ढगे, संजय चिंचोलकर, शंकर तूपकरी स्वामी, जनार्दन आठवले, भरत टेकाळे, संजय गायकवाड, प्रल्हाद घोरबांड गुरुजी, संभाजी धुमाळ, श्रीराम भुसेवाड, वीरभद्र स्वामी, बालाजी बंडेवार, ईश्वर सुरदुसे, विष्णू शिंदे, सुनीताताई डांगे, शोभाताई , भारत सूर्यवंशी, बळवंतराव कुलकर्णी, सुरेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.


विदेशी वस्तू तसेच कंपनीच्या छायाचित्र असलेले रंगीत पॉम्पलेट फाडून सादकांनी विदेशी वस्तू व कंपनीचा बहिष्कार केला व प्रत्येकाने संकल्प केला “आजपासून विदेशी वस्तू वापरणार नाही” तसेच “विदेशी कंपनीकडून सेवा घेणार नाही” असे पतंजली योग परिवाराचे जिल्हा प्रभारी राम शिवपनोर यांनी सांगितले. या रॅलीसाठी आर्थिक सहाय्य अनिलजी कामिनवार यांनी केले, सर्व सादकांना नाश्त्याची व्यवस्था अनिल शेटकार यांनी केले तर रॅलीचे नियोजन अनिल अमृतवार यांच्यामार्फत करण्यात आले.


