हिमायतनगर| शहरातील रेल्वेस्थानक रस्त्यावर असलेल्या छत्रपति शिवाजी नगरातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी घरात प्रवेश करत लोखंडी अलमारीतील जवळपास ७३ हजारांचा सोनेचांदीच्या दागिन्यांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा चोरटे सक्रिय झाले असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हिमायतनगर शहर व तालुक्यात मागील काही महिन्यापासून शेतातील आखाड्यावर चोरटयांनी हळदीसह, मुके जनावरे, शेतातील पाईपलाईन आदिसां अन्य साहित्य चोंरून नेऊन शेतकऱ्यांची झोपडवीली होती. त्या चोरीच्या घटनांचा तपस जैसेथे असताना आता चोरट्यानी आपला मोर्चा शहराकडे वळविला आहे. शहरातील बालाजी उत्तम पुरी लाईनमन रा. छत्रपती शिवाजी नगर रेल्वे स्टेशन रोड हिमायतनगर हे आपल्या मुलाबाळांसह बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरटयांनी संधीचा फायदा घेत दि 16 ते 18 च्या दरम्यान घराच्या गेटचे व दरवाजाच्या कुलुप तोडून आता प्रवेश केला. तसेच घरातील सामानाची नासधूस करत ओनिडा कंपनीची टीव्ही, बेडरूममध्ये असलेल्या कापटातील 30 हजार रुपये किमतीचे सोन्याच्या अंगठ्या २ अंदाजे किंमत ६० हजार, चांदीचे २५ तोळ्यांचे पैंजन, असा एकूण ७३ हजार रुपये किमतीचे दागिने चोरुन नेला आहेत.
हा प्रकार दि.१८ रोजी बाहेरगावी गेलेले पुरी परिवार घरी आल्यानंतर लक्षात आला. घरात पाहणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर बालाजी उत्तम पुरी लाईनमन हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या चोरी प्रकरणी हिमायतनगर पोलीस डायरीत गुन्हा रजिस्टर्ड नंबर १३६/२०२४ कलम ४५७, ३८० अनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर शहरच्या बिट जमादार कोमल कागणे व त्यांचे सहकारी करीत आहेत. या चोरीच्या घटनेमुळे शहर व परिसरात चोरटे पुन्हा सक्रिय झाले असल्याचे दिसत असून, नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हि बाब लक्षात घेता हिमायतनगर पोलिसांनी शहर गस्त वाढवावी अशी मागणी केली जात आहे.