हिमायतनगरच्या छत्रपति शिवाजी नगरात बंद घराचे कुलूप चोरटयांनी तोडले; ७३ हजारांचा सोनेचांदीचा ऐवज लंपास – NNL
हिमायतनगर| शहरातील रेल्वेस्थानक रस्त्यावर असलेल्या छत्रपति शिवाजी नगरातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी घरात प्रवेश करत लोखंडी अलमारीतील जवळपास ७३ हजारांचा सोनेचांदीच्या दागिन्यांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा चोरटे सक्रिय झाले असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हिमायतनगर शहर व तालुक्यात मागील काही महिन्यापासून शेतातील आखाड्यावर चोरटयांनी हळदीसह, मुके जनावरे, शेतातील पाईपलाईन आदिसां अन्य साहित्य चोंरून नेऊन शेतकऱ्यांची झोपडवीली होती. त्या चोरीच्या घटनांचा तपस जैसेथे असताना आता चोरट्यानी आपला मोर्चा शहराकडे वळविला आहे. शहरातील बालाजी उत्तम पुरी लाईनमन रा. छत्रपती शिवाजी नगर रेल्वे स्टेशन रोड हिमायतनगर हे आपल्या मुलाबाळांसह बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरटयांनी संधीचा फायदा घेत दि 16 ते 18 च्या दरम्यान घराच्या गेटचे व दरवाजाच्या कुलुप तोडून आता प्रवेश ...
