Homeमहाराष्ट्रbhajan movement : लोकपारंपारिक कलावंताच्या भजन आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणली

bhajan movement : लोकपारंपारिक कलावंताच्या भजन आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणली

नांदेड| गत दोन वर्षांपासून वृद्ध साहित्यिक व कलावंतांच्या मानधनाची निवड प्रक्रिया रखडल्याने यासाठीची राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत मानधन निवड जिल्हास्तरीय समिती पूनर्गठित करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्याकडे जिल्हाधिकारी तथा,सदरिल समितीचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यासह अन्य प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अभिवचन जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी दिल्याने बहुजन टायगर युवा फोर्स च्यावतिने लोकपारंपारिक कलावंतांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुरु केलेले आंदोलन तुर्त स्थगित केले.लोकपारंपारिक कलावंतांनी भजन आंदोलन करुन आज दि.२१ मार्च रोजी जिल्हा परिषद दणाणून सोडली होती.त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती.

अधिक माहिती अशी की,राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत सन् २०२३- २४ व सन् २०२४-२५ या दोन वर्षातील निवड रखडल्याने यासाठीची जिल्हास्तरीय समिती पूनर्गठित करावी,जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून २०% सेस निधी अंतर्गत सन् २०२४-२५ मध्ये एकाच कुटूंबातील अनेक व्यक्ती विविध योजनेसाठी पात्र ठरविल्यानै सदरच्या योजनानिहाय निवडी रद्द करण्यासह संबंधित दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी व नव्याने निवडयादी करुन पात्र अर्जदारांनाच योजनानिहाय लाभ द्यावा,शासन निर्देशानुसार कार्यान्वित केलेला भोकरच्या बांधकाम विभागात नियुक्त कार्यकारी अभियंता व अन्य अधिकारी- कर्मचाऱ्यांना मूळ पदस्थापना व मुख्यालयी राहण्याची ताकीद द्यावी.

जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून कंत्राटी उप अभियंता भाऊसाहेब घोडे यांची नियमबाह्यपणे केलेली नियुक्ती रद्द करुन सदर नियुक्ती आणि मुदतवाढीसह मानधनवाढीच्या प्रकरणाची चौकशी करून नव्याने निकषांनुसार कंत्राटी उप अभियंता नियुक्ती द्यावी आदी विविध प्रलंबित मागण्यांबाबत बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्रच्या पदाधिकाऱ्यांसह लोकपारंपारिक कलावंतांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आज केलेल्या भजन आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणून सोडल्यानंतर जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी या भजन आंदोलनाची दखल घेतली.

तात्काळ याबाबत आपल्या दालनात बैठक घेत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार,बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल चोपडे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, पंचायत व जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या संबंधित अधिकारी-कर्मचारी व आंदोलनकर्ते बहुजन टायगर युवा फोर्सच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन या प्रकरणात सदरच्या सर्वच मागण्या मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे अभिवचन दिल्यानंतर आजचे आंदोलन तुर्त स्थगित करण्यांत आले.

या भजन आंदोलनात बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे,प्रदेश प्रवक्ता लक्ष्मणराव मा.भवरे,शाहीर माधव वाढवे, शाहीर रमेश नारलेवाड,शंकर गायकवाड,बापुराव जमधाडे, सुमेध एडके, गोरखनाथ मस्के, शिवाजी डोखळे,अविनाश कदम,नागोराव मेंडेवाड,जळबा जळपते, परमेश्वर वालेगांवकर, केशव माने,परसराम राठोड, किशन ठमके,बालाजी वाढवे आदींसह नांदेड जिल्ह्यातील शेकडो लोकपारंपारिक कलावंत आपल्या लोकपारंपारिक वेशभुषेत सहभागी झाले होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments