HomeनांदेडDr. Hansraj Vaidya : ना.अजित दादा, ज्येष्ठ नागरिकांनां आता तुम्हीच वाचवा हो...

Dr. Hansraj Vaidya : ना.अजित दादा, ज्येष्ठ नागरिकांनां आता तुम्हीच वाचवा हो -डाॅ.हंसराज वैद्य

नांदेड| उद्याच्या रविवारी,दि.23/3/2025 या “शहिद दिनी”, गरिब गरजवंत पंधरा ते विस हजार ज्येष्ठ नागरिक स्वेच्छेने,असल्या कडक तळपत्या उन्हात “लक्षवेधी महा पदयात्रेत सह भागी होऊन आमरण अन्न पाणी त्याग” करणार आहेत.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मंत्री तथा अर्थ मंत्री मा.ना.अजित दादा पवार साहेबही योगायोगाने “ए सी” तल्या कांही “मावळ्यांना” जवळ करण्याच्या मोहिमेवर त्याच दिवशी नांदेड महानगरीत येत आहेत. नांदेडचे महा शक्तीशाली तथा महा प्रतापी मा.आ.प्रताप पाटील चिखलीकर साहेबही त्यांच्या सोबतच आहेत. ज्येष्ठ नागरिकांना पांडूरंगाच्या शपथेवर आमदार चिखलीकर साहेबांनी पाच वर्षापूर्वीच ज्येष्ठ नागरिकांना अभिवचण दिलेले आहे की, ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित प्रश्नांबाबतीत शासनाकडून सोडवून घेण्या कामी ते ज्येष्ठ नागरिकांबरोबर आहेत.

आता खरं तर हा “दुग्ध शर्करा” योग आहे. “ए सी” तलेच कांही मावळे नाही तर नांदेड जिल्ह्यातील “येसी” तले पंधरा ते विस हजार “ज्येष्ठ नागरिक माय-बाप मावळे बणून “(कुटूंब प्रमुख)जिवनाला कंटाळून “लक्षवेधी महा पदयात्रेत व आमरण अन्न पाणी त्याग” करून जीवन यात्रा संपविण्या साठी एकत्र जमत आहेत.यातून मा.आ. प्रतापराव पाटील चिखलीकरांची “वचण पूर्ती” व मा.ना. अजित दादांची कांही “ए सी” तले “मावळे” जवळ करण्याच्या मोहीमेत, “येसी”तले पंधरा ते विस हजार “ज्येष्ठ नागरिक मावळे”(कुटूंब प्रमुखांचे) “घबाड” कायम स्वरूपी “जवळ” करण्याची नामी संधी त्यांना प्राप्त झाली आहे!
.
एवढेच मर्यादित नाही तर आख्या महाराष्ट्रातले “सकळ ज्येष्ठ नागरिक” अर्थात “आख्खा महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ (फेस्काॅम)” मा.ना.अजित दादा पवार अर्थात “महा युती शासनाच्या” पाठीशी ठामपणे उभा राहिल यात तिळ मात्र शंका नाही!आणि कित्येक ज्येष्ठ नागरिक उष्मा घातामुळे आणि अन्न पाणी त्यागामुळे मृत्यूमुखी पडून दगावल्याची नामुस्की या महायुती शासनाची टळू शकेल!
.
तेव्हा मा.ना. अजित दादा पवार साहेबांना व मा.आ. प्रताप पाटील चिखलीकर “दादा-द्वयांना” नम्र विनंती की त्यांनी स्वतःचे कान व डोळे उघडे ठेवावेत आणि अंतर आत्म्यास जागृत करावे.वेळात वेळ काढून प्रत्येक्ष खर्‍या गरिब, गरजवंत, दुर्लक्षित,उपेक्षित,वंचित शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी, कामगार ,निराधार, विधवा माता तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांची “ह्याचि देही,ह्याचि डोळा” लक्षवेधी महा पदयात्रा व आमरण अन्न पाणी त्याग चळवळीतील “ज्येष्ठ माय बापांची” भेट घ्यावी व कांही तरी त्यांच्या साठी करावे, त्यांचे सांतवन करून पुण्य कर्म करण्याची संधी घालवू नये! व महाराष्ट्रातच नाही तर देशात नाव ककककमवावे! संधी घालवू नये एवढेच..! आम्ही ज्येष्ठ नागरिक जिल्हाधिकार्यालया समोर आपली वाट पहात असू….

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments