नांदेड। एन्जॉय स्विमिंग ग्रुप नांदेडच्या वतीने कै. शांताराम संगणे जलतरणिका नांदेड येथे रविवारी दि. १६ जून रोजी सकाळी ७ ते १० पर्यंत २९ व्या भव्य जलतरण स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष ॲड. चिरंजीलाल दागडिया व सचिव धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
मागील २८ वर्षांपासून जलतरण क्षेत्रातील एन्जॉय स्विमिंग ग्रुप ही संस्था अशा स्पर्धांचे व रक्तदान शिबिरांचे आयोजन दरवर्षी करीत असते. स्पर्धा यशस्वी व्हावे यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. स्वागत समिती: जयप्रकाश मूंदड़ा, द्वारका साबु, केशव मालेवार, व्यंकटेश जिंदम, प्रसिद्धी समिती:शैलेष तोष्णीवाल,मुरलीधर अट्टल, दीपक बोधने ,अर्थ समिती: गंगाधर बड़वणे, लक्ष्मीकांत माळवतकर, भास्कर स्वामी, अल्पोहार समिती:रमेश डागा ,सुभाष गादेवार, शिरीष गीते, बालाजी यलगंटवार, प्रथमोपचार समिती: डॉ. पी. सुदर्शन, डॉ. संतोष मालपाणी, डॉ.राजेश अग्रवाल, डॉ. सुनील बासटवार, तांत्रिक समिती:मुकेशभाई ठक्कर,नारायण चव्हाण, नरेंद्र कुलकर्णी, स्पर्धेसाठी विविध वयोगट ठेवण्यात आले आहे.
त्यामध्ये १० वर्षा खालील,११ ते १३ वर्ष,१४ ते १६ वर्ष,१७ ते १९ वर्ष या गटातील मुले आणि मुलींसाठी पन्नास मीटर फ्रीस्टाइल व दोनशे मीटर आयएम च्या स्पर्धा ठेवण्यात आले आहेत .पुरुष व महिला गटाच्या पन्नास मीटर फ्रीस्टाइलच्या स्वतंत्र स्पर्धा २० ते २५ वर्ष,२६ ते ३० वर्ष,३१ ते ३५ वर्ष,३६ ते ४० वर्ष,४१ ते ४५ वर्ष,४६ ते ५० वर्ष,५१ ते ५५ वर्ष,५६ ते ६० वर्ष,६१ ते ६५ वर्ष,६६ ते ७० वर्ष,७० वर्षा वरील वयोगटात घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील तीन विजेत्यांना आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी जलतरण प्रशिक्षक राजेश सोनकांबळे व तुटेजा यांच्याशी संपर्क साधावा. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने जलतरणपटूंनी भाग घ्यावा, असे आवाहन एन्जॉय स्विमिंग ग्रुपच्या वतीने करम्यात आले आहे.