नवीन नांदेड l हनुमान जन्मोत्सव समिती सिडको हडको व श्रीराम जन्मोत्सव समिती नांदेड यांच्या वतीने हिंदूं एकत्रिकरण साठी भव्य कावड यात्रा आयोजन 6 जुलै रोजी श्री सिध्देश्वर महादेव मंदिर सिडको ते उर्वशी महादेव मंदिर नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.


दरवर्षी प्रमाणे याही तिसऱ्या वर्षी हिंदू एकत्रीकरण साठी भव्य कावड यात्रेचा मार्ग श्रीसिद्धेश्वर महादेव मंदिर ND41 साईनगर बिडी कामगार कॉलनी सिडको ते हडको सिडको मार्ग महाराणा प्रतापसिहं चौक सिडको ते लातूर फाटा जुना मोंढा ते हनुमान पेठ,मुथा चौक ते देगांवचाळ मार्ग श्री उर्वशी महादेव मंदिर गंगाचाळ नांदेड या मार्गावर सकाळी 08.00 वाजता सुरू होणार आहे,या यात्रेत भाविक भक्तांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री राम जन्मोत्सव समिती नांदेड, श्री हनुमान जन्मोत्सव सिडको हडको,भस्म रमैय्या मित्र मंडळ नांदेड यांनी केले आहे.




