कंधार,सचिन मोरे। तालुक्यातील तळ्याचीवाडी येथे सोमवारी दि.16 रोजी दुपारी 2.20 वाजता शॉर्ट सर्किटमुळे बंद घराला अचानक आग लागून रोख रक्कम 92 हजार रुपयांसह घरातील संसार उपयोगी असे एकूण 4 लाख रुपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले.


याबाबत सविस्तर माहिती अशी की सोमवारी दि.16 जून सोमवारी दुपारी 2.20 वाजेच्या सुमारास तळ्याचीवाडी येथील गोविंद भानुदासराव गर्जे हे पत्नीसह कंधारला आठवडी बाजार करण्यासाठी गेले व त्यांची मुले शाळेत गेली होती.बंद घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली.यावेळी घरातून धूर येत असल्याचे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.वीज वितरण कंपनीला याची कल्पना दिल्यावर येथे तत्काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला.



घरात आगीने रौद्र रूप धारण केल्याने घरातील रोख रक्कमेसह संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने गोविंद गर्जे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.रोख रक्कम 92 हजार रुपये संसार उपयोगी साहित्य टीव्ही,फर्नीचर, लोखंडी कपाट,फ्रिज, पलंग,भांडे, कपडे,92 हजार रुपये असे एकूण 3 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे .या घटनेचा ग्रामपंचायत अधिकारी यानी पंचनामा केला आहे.या घटनेमुळे तळ्याचीवाडी सह परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.




