हदगांव, शेख चांदपाशा| हदगांव तालुक्यातील शिरड (वाणी) या गावाच येथील युवाशेतकरी आपल्या घरगुती कामानिमित्त परभणी येथे गेले होते. ते काम आटोपून वारंगा हायवे रोड मार्ग आपल्या गावाकडे निघाले असता बरडशेवाळा या गावाच्यावळच्या बायपासवर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच – मृत्यू झाला आहे.


ही घटना सोमवारी रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली या बाबत मिळालेली माहीती नुसार हदगाव तालुक्यातील शिरड (वाणी) येथील युवा शेतकरी गजानन राऊत (28) हे काही कामा निमित्त आपल्या काही खासगी कामा निमित्त परभणी जिल्ह्यात येथे गेले होते तो तेथून गावाकडे निघाला असता रात्री ८.३० वाजताच्या सुमारास बरडशेवाळा गावाच्या बायपास वर आज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे.


त्याच्या पश्चात पत्नी, आई, बहीण असा परिवार आहे. . रात्री ९.३० वाजेपर्यंत रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यामुळे जखमी झालेल्या गजानन राऊत याचा जाग्यावरच मृत्यू झाला होता या NH361 महामार्ग वर नेहमीच अशा अपघाताच्या घटनानेहमी सातत्याने घडत आहेत. याबाबत अनेक वेळा विविध माध्यम अन्य वृत्तपत्रातून स्थानीय पत्रकार आवाज उठत असतात परंतु रस्ते सुरक्षा समिती किंवा राष्ट्रीय महामार्गाच अधिकारी याकडे लक्ष दिल्याचे दिसून येत नाही…!


‘किती जीव घेणार…
जेव्हा पासून तुळजापूर नागपूरNH 361 सुरु झाला आहे. तेव्हापासून या राष्ट्रीय महामार्गावर अनेक अपघात आता नित्याचेच झाले आहे. या राष्ट्रीय महामार्गावर कुठे हॉस्पिटल अंबुलन्स, अग्निशमनदल पोलीस स्टेशन रेड बॉक्स याचे बोर्ड दिसून येत नाहीत. वास्तविक पाहता या अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर 24 तास अंबुलन्स सेवा असणे आवश्यक आहे. योग्य ते दिशादर्शक बोर्ड ही दिसून येत नाही. नागरिकांना कुठे तक्रार करावी वारंगा ते गोजेगांव या राष्ट्रीय महामार्गा वर कुठे टोल क्रमांक देण्यात आलेले नाही. कोणत्या हा राष्ट्रीय महामार्गे मार्गे कोणत्या संबंधित विभागाशी जोडलेला आहे. याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही परिणाम स्वरूप अनेकांना आपला जीव गमावा लागत आहे याबाबत मुजोर संबंधित विभाग का दखल घेत नाही वस्तुस्थिती असून, असा संतप्त सवाल नागरिक करीत असताना दिसून येत आहे.



